Last Updated on 30 Dec 2022 12:29 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली
मुंबई । पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे निधन झाले आहे.त्या 100 शंभर वर्षांच्या होत्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईची तब्येत बिघडली होती,त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान, त्यांची प्राणज्योत मालवली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत 18 जून रोजी आपला 100 वा वाढदिवस साजरा केला.गुजरात निवडणुकीआधी मार्च 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये आपल्या घरी जाऊन आईचे आशीर्वाद घेतले होते.हिराबेन यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.आईच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.आईमध्ये नेहमीच एका त्रिमूर्तीचा भास व्हायचा असं मोदींनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी मातेस वाहिली श्रद्धांजली
“मातेचे जीवन हे एक यशस्वी शतायुष्यी जीवन असून, ते आज ईश्वरचरणी विश्रान्त झाले आहे”, असे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
आज पंतप्रधानांच्या मातोश्री श्रीमती हीराबेन मोदी यांचे निधन झाले.तपस्वी आचरण, निस्वार्थ कर्मयोग आणि मूल्यांना समर्पित जीवन अशा त्रिगुणांचा त्या जीवनात समावेश होता,याचे स्मरण पंतप्रधानांनी यावेळी केले.
प्रत्येक कार्य शहाणीवतेने केले पाहिजे आणि जीवन विशुद्धतेने जगले पाहिजे,या त्यांनी
आपल्या 100 व्या वाढदिवशी पंतप्रधानांना केलेल्या उपदेशाचेही त्यांनी स्मरण केले.
आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले:
“एका समर्पित शतायुषी जीवनाचा ईश्वरचरणी शानदार विराम…, एक तपस्वी जीवन यात्रा, निष्काम कर्मयोगाचे प्रतीक आणि मूल्यांवरील अचल निष्ठा यांना हे जीवन समर्पित झाले होते.
मी जेव्हा त्यांना 100 व्या वाढदिवसाच्या दिवशी भेटलो तेव्हा त्यांनी एक गोष्ट मला सांगितली, जी नेहमी माझ्या स्मरणात राहील, ‘कार्य करा बुद्धीने आणि जीवन जगा शुद्धिने’ म्हणजे प्रत्येक कार्य शहाणीवतेने केले पाहिजे आणि जीवन विशुद्धतेने जगले पाहिजे”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली
नागपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या जडणघडणीत अमूल्य वाटा असणाऱ्या त्यांच्या मातोश्री श्रीमती हिराबेन मोदी यांचे निधन अत्यंत दुःखद असल्याची शोकभावना व्यक्त करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीमती हिराबेन मोदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
“श्रीमती हिराबेन यांच्यासारख्या धर्मानुरागी, सात्विक व्यक्तिमत्वाचे निधन ही समाजाची हानी आहे. नियतीचक्रामुळे आज श्रीमती मोदी यांची इहलोकीची यात्रा संपली. ही बाब पुत्र म्हणून प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्यासाठी एक आघात आहे. आईचा वियोग ही दुःखाची परिसीमा असते. प्रधानमंत्री श्री. मोदी यांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. मातृतुल्य श्रीमती हिराबेन मोदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!” अशी शोकभावनाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.












































































