Last Updated on 09 Jul 2022 1:48 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पंतप्रधान, 12 जुलैला देवघर आणि पाटण्याला देणार भेट
बैद्यनाथ मंदिर आणि पाटणालाही भेट देणार
नवी दिल्ली ।
पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जुलै रोजी झारखंडमधील देवघर आणि बिहारची राजधानी पाटणाला भेट देणार आहेत.पंतप्रधान देवघरमध्ये 16,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.यानंतर ते बाबा बैद्यनाथ मंदिरात बारा ज्योतिर्लिंगांपैकी एका ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतील आणि पूजा करतील.
बाबा बैद्यनाथ धामला थेट कनेक्टिव्हिटी देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून ते देवघर विमानतळाचे उद्घाटन करतील.सुमारे 400 कोटी रुपये खर्चून ते बांधण्यात आले आहे.बैद्यनाथ धाम हे देशभरातील भाविकांसाठी महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे.
PMO नुसार,पंतप्रधान मोदी त्याच दिवशी पाटणा येथे बिहार विधानसभेच्या शताब्दी समारंभाच्या समारोप सत्राला संबोधित करतील.बिहार विधानसभेला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ शताब्दी स्मारक स्तंभाचे उद्घाटनही ते करणार आहेत.











































































