Last Updated on 21 Nov 2024 9:20 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । गयानाच्या संसद सभागृहात आज एका समारंभात गयानाचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद इरफान अली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ऑर्डर ऑफ एक्सलन्स’ हा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव केला. दूरदर्शी राजकीय नेतृत्व, जागतिक स्तरावर विकसनशील देशांच्या अधिकारांचा पुरस्कार, जागतिक समुदायाची असामान्य सेवा आणि भारत-गयाना संबंधांना बळकटी देण्याची वचनबद्धता याबद्दल पंतप्रधानांचा बहुमान करण्यात आला.
पंतप्रधानांनी हा पुरस्कार स्वीकारताना, तो भारताच्या जनतेला आणि दोन्ही देशांमध्ये अतिशय खोलवर रुजलेल्या ऐतिहासिक संबंधांना समर्पित केला. आपला सरकारी दौरा म्हणजे भारत-गयाना मैत्रीला दृढ करण्याच्या दिशेने भारताच्या सातत्यपूर्ण बांधिलकीचा दाखला आहे, यावर त्यांनी भर दिला.
गयानाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील केवळ चौथे परदेशी नेते आहेत.











































































