Last Updated on 10 Nov 2024 5:26 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पंढरपूर : १२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर समितीचे प्रवेशद्वार, मंदिराचे शिखर, सात मजली दर्शन मंडप या ठिकाणी रंगीबेरंगी आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.

विद्युत रोषणाईमुळे मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला आहे. आषाढी आणि कार्तिकी एकादशीचा दिवस वारकरी सांप्रदायासाठी प्रचंड आनंद आणि उत्साहाचा दिवस असतो. पंढरपुरात या दोन्ही दिवशी मोठी जत्रा भरते. हजारो भाविक पंढरपुरात दाखल होतात.














































































