Last Updated on 25 Mar 2022 10:33 PM by Sanjay Patil/Adhorekhit
चंदीगढ |
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने सत्ता स्थापन केल्यानंतर धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.पंजाबचे नवनियुक्त मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ‘वन एमएलए वन पेंशन’ असा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आमदाराने कितीही वेळा निवडणूक जिंकली तरी त्याला एका टर्मचंच निवृत्ती वेतन मिळणार आहे.
म्हणजेच आमदाराने कितीही वेळा निवडणूक जिंकली तरी त्याला एका टर्मचेच निवृत्ती वेतन मिळणार आहे.सोबतच अनेक आमदारांच्या कुटुंबाचे निवृत्ती वेतनही कमी केलं जाणार आहे.
जाबमध्ये ३५ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम स्वरुपी नोकरीवर घेण्यात येणार असल्याची घोषणा पंजाबचे नवनियुक्त मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मंगळवारी केली.
त्यानंतर,आता माजी आमदारांना केवळ एकच टर्मची पेन्शन देण्यात येणार असल्याचा निर्णयही पंजाब सरकारने घेतला आहे.मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज याची घोषणा केली म्हणजेच आमदाराने कितीही वेळा निवडणूक जिंकली तरी त्याला एका टर्मचेच निवृत्ती वेतन मिळणार आहे.सोबतच अनेक आमदारांच्या कुटुंबाचे निवृत्ती वेतनही कमी केले जाणार आहे.
निर्णयामुळे पंजाब सरकारचे कोट्यवधी रुपये वाचणार आहेत.वाचणारा निधी पंजाबच्या आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी वापरणार आहे.












































































