Last Updated on 07 May 2023 1:22 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात नीट परीक्षा उद्या होणार आहे.ही परीक्षा देशभरातील देशभरातल्या 499 शहरांमध्ये आणि देशाबाहेरील 14 शहरांमधील विविध केंद्रांवर दुपारी 2 ते 5.20 या वेळेत घेतली जाईल.देशभरातील 20 लाखांहून अधिक उमेदवार ही परीक्षा देत आहेत.ज्या वैद्यकीय इच्छुकांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे ते उमेदवार अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वरून त्याचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.मणिपूरमधली परीक्षा मात्र परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
तिथली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आणि मणिपूर सरकारच्या विनंतीवरून हा निर्णय घेण्यात आला आहे.या सर्व उमेदवारांच्या परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार असल्याचं एजन्सीनं एका निवेदनात म्हटलं आहे.उमेदवार नीटशी संबंधित कोणत्याही स्पष्टीकरणासाठी दूरध्वनी क्रमांक ०११-४०७५९०००वर संपर्क साधू शकतात किंवा neet@nta.ac.in वर ईमेल करू शकतात.
परीक्षेला जाताना ही कागदपत्रे तयार ठेवा
- प्रवेशपत्र सोबत असणे आवश्यक.
- प्रवेशपत्रावर पासपोर्ट साईझ फोटो असावा.
- एक पासपोर्ट साईझ फोटो सोबत ठेवा, जो हजेरी पत्रकावर चिकटवला जाईल.
- वैध मूळ ओळखपत्र सोबत ठेवा.
- दिव्यांग प्रमाणपत्र, लागू असल्यास, सोबत असणे आवश्यक आहे.
या गोष्टी सोबत घेऊन जाऊ नका
- स्टेशनरी वस्तू जसे की पेन्सिल, पेन, बॉक्स, खोडरबर, कॅल्क्युलेटर, रायटिंग पॅड इत्यादी.
- तसेच मोबाईल, पेन ड्राईव्ह, इलेक्ट्रॉनिक वस्तू, स्मार्टवॉच, इअरफोन, हेल्थ बँड सोबत बाळगू नका.
- गॉगल, हँडबॅग, पाण्याच्या बाटल्या, कोणत्याही प्रकारच्या खाद्यपदार्थांनाही बंदी आहे.












































































