Last Updated on 19 Jul 2023 8:13 PM by Sanjay Patil/Adhorekhit
इस्लामपुर विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचा जल्लोष,फटाक्याची आताषबाजी
सांगली । इस्लामपुर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख व सांगली जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांची सांगली जिल्हा भाजपाच्या अध्यक्षपदी निवड झाली.या निवडीची बातमी बुधवारी सकाळी संपूर्ण इस्लामपुर विधानसभा मतदारसंघासह सांगली जिल्हयामध्ये येवून धडकली अन् इस्लामपुर,आष्टा शहरासह इस्लामपुर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात फटाक्याची आताषबाजी करत साखर व पेढे एकमेंकास भरवून भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी आनंदोत्सव साजरा करत एकच जल्लोष केला.
जिल्हा अध्यक्षपदी निवड झालेबद्दल संपूर्ण महाराष्ट्रसह सांगली जिल्हयातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रिडा, सहकार, आरोग्य, वृत्तपत्र क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी समक्ष भेटून व दूरध्वनी वरून निशिकांत भोसले -पाटील यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संपूर्ण महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा अध्यक्षाची निवड मंगळवारी रात्री उशिरा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चद्रंशेखर बावनकुळे यांच्याकडून घोषित करण्यात आली. या निवडी मंगळवारी रात्री उशिरा जाहिर झााल्याने या निवडीची बातमी बुधवारी पहाटे सांगली जिल्हयामध्ये सोशल मिडीया व न्युज चॅनेल च्या माध्यमातून सर्वत्र पसरली गेली आणि इस्लामपुर शहरात बुधवारी पहाटेच फटाक्याची आताषबाजी करत साखर व पेढे वाटून दिवाळी साजरी केली.
निशिकांत भोसले-पाटील यांनी या निवडीबद्दल पक्ष श्रेष्ठीचे आभार मानले असून या निवडीनंतर त्यांनी प्रकाश शैक्षणिक संकुलातील गणपती मंदिरातील गणपतीचे दर्शन घेतले या ठिकाणी निशिकांत भोसले-पाटील यांच्या हस्ते महाआरती चे आयोजन करण्यात आले होते. प्रकाश संकुलाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. इस्लामपुर मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यानी प्रकाश शैक्षणिक संकुलामध्ये मोठी गर्दी केली होती. या ठिकाणावरून सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यासह इस्लामपुर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वाळवा पंचायत समिती आवारातील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळयाला निशिकांत भोसले-पाटील यांनी पुष्पहार घालून अभिवादन करत आशिर्वाद घेतले. यावेळी शहरातील विविध चौकात फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली.

प्रकाश शैक्षणिक व आरोग्य संकुलामध्ये निशिकांत भोसले-पाटील यांनी दिवसभर शुभेच्छा स्विकारल्या यावेेळी सांगली लोकसभा मतदारसंघचे खासदार,संजय पाटील,पश्चिम महाराष्ट संघटन मंत्री मकरंद देशपांडे,हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी सत्यजीत देशमुख,सांगली जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संग्रामभाऊ देशमुख,जत विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख रवि तमनगौंडा पाटील,भाजपा महाराष्ट्र कामगार आघाडीचे उपाध्यक्ष अमित कदम, सांगली जिल्हा भाजपाचे संघटन सरचिटणीस मिलिंद कोरे, सांगली जिल्हा भाजपा ओबीसी सेलचे अध्यक्ष व दिनदयाळ सहकारी सुतगिरणीचे उपाध्यक्ष विलास काळेबाग , सांगली जिल्हा भाजपा अल्पसंख्याकचे अध्यक्ष अजमभाई मकानदार, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे नगरसेवक गणेश माळी, खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष सुहास पाटील, भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य जयसिंगराव उथळे, भाजपा जिल्हा सरचिटणीस संजय हवलदार, कवठेमहाकाळ पंचायत राजचे शहराध्यक्ष रविंद्र गाढवे, भाजपाचे शिराळा तालुका अध्यक्ष हणमंतराव पाटील, माजी अध्यक्ष सुखदेव पाटील, इंचलकरजी मतदारसंघाचे प्रमुख अरविंद शर्मा, कोल्हापूर जिल्हा भाजपा चे खजिनदार बाळकृष्ण तोतला, कवठेमहाकाळ च्या शिवसेना नेत्या सौ. स्नेहल पाटील, वाळवा तालुका शिवसेनेचे अध्यक्ष सागर मलगुंडे, माजी नगरसेवक वैभव पवार, फारूख इबुशे, सुभाष शिंगण, गजानन फल्ले, डॉ. सतिश बापट, वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष धैर्यशील मोरे, भाजपा वाळवा तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष मधुकर हुबाले, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सुरेखाताई जगताप, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपा वाळवा तालुका संघटन सरचिटणीस संदिप सावंत, भाजपा वाळवा तालुका सरचिटणीस यदुराज थोरात,दादासाहेेब रसाळ, भाजपा वाळवा तालुका उपाध्यक्ष निवास पाटील, सांगली जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष प्रविण माने,प्राजंली बँकेचे अध्यक्ष अक्षय पाटील, भाजपा शहर अध्यक्ष अशोक खोत, भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष सतेज पाटील, युवा नेते अजित पाटील, युवती अध्यक्षा स्मिता पवार, संघटन सरचिटणीस प्रविण परिट,संदिपराज पवार, गौरव खेतमर, अल्ताफ तहसिलदार, सलिम कच्ची, अक्षय कोळेकर, फिरोज पटेल, समिर मुल्ला, मिरवाडीच्या सरपंच जयश्री साळुखे, दुधगाव सरपंच करिश्मा पाखरे, कुरळपचे नेते अशोक पाटील, सरपंच डॉ.मदन शेटे नरसिंहपुरचे सरपंच शोभाताई जगताप,फाळकेवाडीचे माजी उपसरपंच संदिप काटकर, प्रविण फाळके, दिलीप कुंभार, सर्वोदय सह.कारखान्याचे संचालक महावीर चव्हाण, आदीसह इस्लामपुर विधानसभा मतदासंघातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्थाचे पदाधिकारी, सरपंच व उपसरपंच ग्रापं.सदस्य, मोठया संख्येने उपस्थित होते.
तर दुरध्वनी वरून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र राज्य भाजपा कार्यालय संपर्क प्रमुख, रवि अनासपुरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.चंद्रकांत पाटील, हातकणगले लोकसभा मतदारसंघाचे खा. धैर्यशील माने, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर, पश्चिम महाराष्ट्र भाजपा संघटन सरचिटणीस मुरलीधर मोहोळ , माजी मंत्री, शिवाजीराव नाईक, माजी जिल्हा अध्यक्ष, पृथ्वीराज देशमुख, जिल्हा बँकेचे माजी संचालक, सी.बी.पाटील, सां.मि.कु. महानगरपालिका सभापती, धीरज सुर्यवंशी, नगरसेवक, विनायक सिंहासने, शिराळा विधानसभा मतदार संघाचे प्रमुख सम्राट महाडीक, कोल्हापूर जिल्हा भाजपा ग्रामीण अध्यक्ष राहूल देसाई, राजवर्धन नाईक- निबाळकर, सातारा भाजपा जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम आदीसह राजकारण,समाजकारण,कला,क्रिडा,शिक्षण आरोग्य क्षेत्रातील विविध मान्यवरानी दुरध्वनी वरून शुभेच्छा दिल्या.









































































