Last Updated on 09 Jul 2023 10:22 PM by Sanjay Patil/Adhorekhit
बुधवार दि. 12 जुलै रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस संपन्न होणार
इस्लामपुर शहरामध्ये भाजपा,निशिकांत दादा युथ व स्पोटर्स फांऊडेशन यांच्या वतीने घर तिथे झाड उपक्रम
गरजु शालेय विदयार्थ्यांना 300 अधिक सायकल भेट,महाआरोग्य शिबीराचे आरोजन
सांगली । इस्लामपुर विधानसभा मतदार संघाचे प्रमुख, सांगली जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांचा वाढदिवस बुधवार दि. 12 जुलै 2023 रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी संपन्न होणार आहे.इस्लामपुर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी, निशिकांत दादा युथ व स्पोटर्स फांऊडेशन यांच्या वतीने घर तिथे झाड हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
शहरातील 20 हजार कुंटुबापर्यत वाढदिवसानिमित्त वृक्ष पोहचवण्यात येणार आहे.तर इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात 50 वृक्षाची लागवड करून त्यांचे संगोपन करण्यात येणार आहे. इस्लामपुर विधानसभा मतदारसंघातील 57 गावामध्ये महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच बरोबर इस्लामपुर शहरातील शालेय विदयार्थाना सायकल वाटप करण्यात येणार असल्याची माहिती निशिकांत भोसले – पाटील (दादा) वाढदिवस गौरव समिती यांनी दिली.
निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांच्या वाढदिवसानिमित्त घर तिथे झाड हा अभिनव उपक्रम इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात राबिवण्यात येत असून वाढदिवसाचे औचित्य साधून 25 हजाराहून अधिक झाडाचे थेट घरा- घरामध्ये जाऊन भारतीय जनता पार्टी, निशिकांत दादा युथ व स्पोटर्स फांऊडेशनचे कार्यकर्ते भेट देणार आहेत.यांचबरोबर वृक्षाचे संगोपन व महत्व पटवून देणारे पत्र निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांच्या स्वाक्षरीने देण्यात येणार आहे. हा उपक्रम शहरामध्ये व ग्रामीण भागामध्ये गुरूवार दि. 13 जुलै ते 20 जुलै पर्यत राबविला जाणार आहे. तर प्रकाश शिक्षण व आरोग्य संकुलामध्ये 500 हून अधिक वृक्षाचे वृक्षारोपन करण्यात येणार आहे.वाढदिवसानिमित्त ग्रामीण भागातील प्रत्येक अंगणवाडी शाळेतील विदयार्थांना, मतदारसंघातील वृध्दाश्रमातील वृध्दाना, सरकारी रूग्णालयातील रूग्णांना खाऊ व फळे वाटप करण्यात येणार आहे.
महाआरोग्य शिबीर
निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांच्या वाढदिवसानिमित्त इस्लामपुर विधानसभा मतदारसंघामधील 57 गावामध्ये प्रकाश हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरच्या वतीने महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये तज्ञ व वैदयकीय डॉक्टराच्याकडून रूग्णाची प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार पुढील उपचारामध्ये शस्त्रक्रिया व हॉस्पिटल सुविधा मोफत देऊन रूग्णांच्यावर यशस्वी उपचार करण्यात येणार आहे. या शिबीरासाठी 20 तज्ञ वैदयकीय स्टाफ ,20 तज्ञ सहकारी स्टाफ, अत्याधुनिक तपासणी व उपचारासह ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये सर्व आजाराची तपासणी करून आवश्यकतेनुसार पुढील उपचार करण्यात येणार आहेत.
गरजु विदयार्थाना सायकल वाटप
निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांच्या वाढदिवसानिमित्त निशिकांत दादा युथ व स्पोटर्स फाऊडेशनच्या वतीने उरूण -इस्लामपुर शहरातील 300 हून अधिक गरजु शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात येणार आहे. इस्लामपुर शहरामध्ये शिक्षण घेणाऱ्या अनेक विदयार्थाच्या कडे सायकल सुविधा नसल्याने शहरातील 300 हून अधिक शालेय विदयार्थाना सायकल वाटप करून त्यांचे असणारे छोटेसे स्वप्न पूर्ण करण्याबरोबर त्यांचा वेळ वाचावा हा पवित्र हेतू ठेऊन निशिकांत दादा युथ व स्पोटर्स फाऊडेशनच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
बुके नको वृक्ष व वही स्विकारली जाईल
बुधवार दि. 12 जुलै रोजी वाढदिवस विविध उपक्रमाने संपन्न होत आहे. यादिवशी सकाळी 11:30 नंतर प्रकाश शिक्षण व आरोग्य संकुलामध्ये शुभेच्छा स्विकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.यावेळी शुभेच्छा देणाऱ्या मान्यवरांनी बुके ऐवजी वृक्ष,वही देऊन शुभेच्छा दयाव्यात असे आहवान निशिकांत भोसले-पाटील (दादा) गौरव समितीने केले आहे.









































































