Last Updated on 28 May 2023 5:35 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । देशाच्या नव्या संसद भवनाचे आज उद्घाटन झाले.पूर्वीपेक्षा मोठी आणि आकर्षक अशी नवी संसद भारताला मिळाली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा उदघाटन सोहळा पार पडला.धार्मिक विधी करत नव्या संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पारंपरिक पद्धतीने कलश पूजन करून सेंगोलची पूजा केली.पूजनानंतर पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष बिर्लांनी सेंगोलची स्थापना लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीशेजारी स्थापना केली.
दरम्यान, आज संसदेच्या उदघाटनवेलई नरेंद्र मोदींनी ‘सत्ता हस्तांतरण चं प्रतीक’ सेंगोल म्हणजेच राजदंड लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या उजव्या बाजूला स्थापित केला.सर्व धर्मीयांच्या प्रथा परंपरांप्रमाणे पूजा करत सेंगोलची स्थापना करण्यात आली.यावेळी मोदी सेंगोलसमोर नतमस्तक झाले.
संसद भवनात राजदंडाची स्थापना
पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्या हस्ते नवीन संसद भवनाचं उद्घाटन केले आहे.कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुरोहितांनी वैदिक मंत्रोच्चारांमध्ये मोदींना सेंगोल म्हणजेच राजदंड सुपूर्द केला.राजदंड हातात घेण्याआधी पंतप्रधान मोदींनी राजदंडाला दंडवत घातला.यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत नवीन संसद भवनात राजदंडाची स्थापना केली. या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात पूजेनं करण्यात आले.
नवीन संसद भवनाच्या निर्मितीसाठी ज्या 60 हजार कामगारांनी योगदान दिले आहे,त्यांचाही यावेळी पंतप्रधान मोदी सन्मान केला. त्यांनी सेंगोलची पूजा केली, त्यानंतर संतांसमोर आदरपूर्वक साष्टांग दंडवक घातला. यानंतर साधू संतांच्या नेतृत्वाखाली आणि वैदिक मंत्रोच्चारात त्यांनी सेंगोलसह नवीन संसद भवनात प्रवेश केला. टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडला नव्या संसद भवनाची इमारत बांधण्याचं कंत्राट मिळालं होतं. सेंट्रल व्हिस्टा क्षेत्राचा मास्टर प्लॅन आणि नवीन गरजांनुसार इमारतींचे डिझाईन तयार करण्यात या कंपनीचा सहभाग आहे.
या प्रसंगी पंतप्रधानांनी ट्विट संदेश जारी केला आहे, त्यात ते म्हणाले;
“आपल्या सर्व देशवासीयांसाठी आजचा दिवस अविस्मरणीय आहे. नवीन संसद भवनामुळे आपणा सर्वांची मने अभिमानाने आणि आकांक्षांनी भरून जाणार आहेत.ही भव्य-दिव्य इमारत सर्वसामान्य जनतेच्या सक्षमीकरणासह देशाची संपन्नता आणि सामर्थ्य यांना नवी गती आणि शक्ती देईल.”
“भारतीय संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन होत असताना, आपल्या सर्वांची हृदये आणि मने अभिमान, आशा आणि वचनांनी भरून गेली आहेत. ही प्रतिष्ठित इमारत सक्षमीकरण करणारी आणि नव्या स्वप्नांना पंख देणारी ठरेल आणि त्यांची जोपासना करून त्यांना प्रत्यक्षात उतरवेल. या इमारतीच्या माध्यमातून आपला महान देश प्रगतीची नवी उंची प्राप्त करो हीच सदिच्छा.”














































































