Last Updated on 11 Dec 2025 10:55 PM by Sanjay Patil/Adhorekhit
हिवाळी अधिवेशनात व्यक्त केला विश्वास
नागपूर । नव्या कायद्यामुळे आष्टा शहरातील ४,६,९ चा प्रश्न सुटण्यास मदत होईल असा विश्वास आ. जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला. ते हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने विधानसभेत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२५ यावर झालेल्या चर्चेत सहभागी होऊन बोलत होते.
यावेळी बोलताना आ. पाटील म्हणाले, इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील आष्टा गावात ४, ६, ९ असे नंबर आहेत. १९१० साली या लोकांना शासकीय जमीनीचं वाटप झालेलं आहे. तेव्हापासून आतापर्यंत वेगवेगळे हस्तांतरण होत आहेत. त्यांना वर्ग २ चं वर्ग १ करणं व ते नियमित करणं यासाठी मी आपल्याकडे लेखी निवेदने दिलेली आहेत. या कायद्यामुळे त्यांना बऱ्यापैकी रिलीफ मिळेल, अशी आशा व्यक्त करतो.









































































