Last Updated on 28 Oct 2023 9:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit
अधोरेखित ऑनलाइन डेस्क । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त अंतर्गत विविध लोकोपयोगी नमो 11 सुत्री कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.नमो तीर्थस्थळ सुधार अभियानातून राज्यातील 73 पवित्र व ऐतिहासिक धार्मिक स्थळांचा विकास होणार आहे.
या नमो 11 सूत्री कार्यक्रमांतर्गत विविध विभागांचे एकूण 10 अभियान निवडण्यात आलेले आहेत यामध्ये नमो तीर्थस्थळ सुधार अभियानासाठी सांस्कृतिक कार्य विभागास नोडल विभाग म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.या अभियानांतर्गत 73 पवित्र व ऐतिहासिक धार्मिक स्थळांची सुधारणा करण्यासाठी निवड करावयाची आहे.अशा 73 ठिकाणी खालीलप्रमाणे कामे हाती घ्यावयाची आहेत…
1. ऐतिहासिक व पुरातन मंदिरांचा जिर्णोध्दार
2. प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देणे
3. डिजीटल दर्शन
4. परिसर सुशोभिकरण
5. स्वच्छता
या अभियानांतर्गत 73 स्थळांची निवड करण्यात आली आहे.नमो 11 सुत्री कार्यक्रमांतर्गत 73 ऐतिहासिक स्थळे,पुरातन मंदिरांची निवड करुन शासनास कळविले आहे.या यादीमध्ये ऐतिहासिक मंदिरे,बारव,तलाव यांचा समावेश करण्यात आला आहे.नमो 11 सूत्री कार्यक्रमांतर्गत या 73 ऐतिहासिक स्थळे,मंदिराची कामे हाती घेण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे.
नमो- 11 सूत्री कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत पुढीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहे
1) पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाने सदर कामे हाती घेण्याच्या दृष्टीने अंदाजपत्रक/आराखडा तात्काळ तयार करावा.
2) ७३ स्थळांच्या ठिकाणी या वास्तूंची माहिती सुचना फलकावर क्युआर कोड सहीत लावण्यात यावीत,तसेच डिजीटल व फिजीकल नकाशे तयार करण्यात यावे.
3) निवडलेल्या प्रत्येक मंदिराच्या योग्य देखभाल व देखरेखीसाठी कमीत कमी ५ भक्तांची समिती तयार करण्यात यावी.
4) या समितीने दर पंधरा दिवसातून एकदा मंदिराला भेट देण्याच्या दृष्टीने नियोजन करावे.
5) या कार्यक्रमाचे वेळापत्रक तयार करण्यात यावे व ही सर्व कामे दि.31.०८. 2024 अखेर पर्यंत पूर्ण होतील, या दृष्टीने नियोजन करण्यात यावे.
6) या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी वेब पोर्टल तयार करण्यात यावे. या वेब पोर्टलवर दर सात दिवसांनी केलेल्या कामांचा अहवाल,व्हिडीओ स्वरूपातील अहवाल व छायाचित्रे अपलोड करण्यात यावीत.
7) वास्तूविशारद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची या कामात मदत घेण्याच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.
या 73 ऐतिहासिक स्थळे मंदिरांच्या जतन व संवर्धनाची कामे पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयामार्फत हाती घेतली जातील.या कामावरील खर्च नियमित योजना,जिल्हा वार्षिक योजना,स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत मंजूर निधीमधून भागविण्यात येणार आहे.नमो ११ सूत्री कार्यक्रमांतर्गत दर्शविलेली उर्वरित कामे उदा.प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देणे, डिजीटल दर्शन,परिसर सुशोभिकरण,स्वच्छता इत्यादी पर्यटन विभागाने आवश्यकतेनुसार हाती घेण्यात येणार आहेत.याबाबत पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाने पर्यटन विभागाशी समन्वय साधून ७३ ऐतिहासिक स्थळे व मंदिरांचा विकास होणार आहे.
नमो 11 सूत्री कार्यक्रमांतर्गत 73 ऐतिहासिक स्थळे अशी :
















































































