Last Updated on 16 Jun 2023 9:27 AM by Sanjay Patil/Adhorekhit
अधोरेखित ऑनलाइन डेस्क । अन्नदाता बजीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी ‘प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी’ योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ही योजना सन 2023-24 पासून राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.राज्य शासनाने तसा अध्यादेश गुरुवारी जारी केला.
शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री कृषी सम्मान निधी (PM-KISAN) योजना सुरु केली असून सदर योजना केंद्र शासनाने विहित केलेल्या निकषांनुसार आणि यासंदर्भात वेळोवेळी केंद्र शासनाकडून प्राप्त होणा-या निर्देशाप्रमाणे संदर्भ च्या शासन निर्णयान्वये राज्यात राबविण्यात येत असुन या शासन निर्णयान्वये सदर योजना राबविण्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे.
अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ही योजना राबविण्याबाबत घोषणा केलेली होती. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मंत्री कृषी सम्मान निधी (PMKSAN) योजनेच्या धर्तीवर “नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राज्यात प्रस्तावास दि.30 मे रोजीच्या रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.
सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे अन्नदाता बजीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ही योजना सन 2023-24 पासून खालीलप्रमाणे राबविण्यास मान्यता देण्यात येत देण्यात आली आहे.
लाभार्थी पात्रता व निकष
1. सदर योजनेसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाण म्हणून गृहीत धरण्यात यांच्यात.
2. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पीएम किसान पोर्टलवर नोंदणी केलेले व केंद्र शासनाच्या निकषानुसार लाभास पात्र ठरलेले सर्व लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील.तसेच केंद्र शासनाने लाभार्थी पात्रतेबाबत वेळोवेळी निकषांमध्ये केलेले बदल तात्काळ परिणामाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांनादेखील लागू होतील.या बदलांकरिता महाराष्ट्र शासनाकडून वेगळा शासन निर्णय निर्गमित करण्याची आवश्यकता राहणार नाही.
3. पी.एम. किसान पोर्टलवर नव्याने नोंदणी होऊन लाभ मिळालेले पात्र लाभार्थी देखील या योजनेचेलाभार्थी राहतील.
योजनेची कार्यपद्धती
पी.एम किसान योजनेच्या पीएफएमएस प्रणालीनुसार प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभास पात्र ठरलेले लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभाखठी पात्र राहतील.सदर लाभार्थ्यांना राज्य शासनामार्फत विकसित करण्यात येणा-या पोर्टलवरून/प्रणालीवरून बँक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे निधी जमा केला जाईल
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना पोर्टल/प्रणाली
1. पी.एम. किसान सम्मान निधी योजनेतील लाभार्थीनाच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत राज्याच्या निधीमधून लाभ देण्यात येणार असल्याने राज्यासाठी कृषि विभाग आणि माहिती व तंत्रज्ञान विभाग यांनी संयुक्तपणे योजनेसाठी पोर्टल/प्रणाली विकसित करण्याची कार्यवाही करावी.
2. केंद्र शासनाच्या संमतीने पी. एम. किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनांच्या पोर्टल/प्रणालीचे एकत्रिकरण Integratior) करण्यात यावे,जेणेकरून अनुदान मिळण्याच्या बदल दोन्ही एकाचवेळी प्रत्यक्षात येईल,
निधी वितरणाची कार्यपध्दती
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या PM KISAN योजनेनुसार खालील वेळापत्रकाप्रमाणे लाभ पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट हस्तांतरणाद्वारे आयुक्त (कृषी)यांच्यामार्फत वितरीत करण्यात येईल.
पहिला हप्ता : एप्रिल ते जुलै (2000 रुपये)
दुसरा हप्ता : ऑगस्ट ते नोव्हेंबर (2000 रुपये)
तिसरा हप्ता : डिसेंबर ते मार्च (2000 रुपये)
योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्यास लाभ प्रदान झाल्यास करावयाची वसुली
सदर योजनेअंतर्गत अपात्र लाभा लाभ प्रदान करण्यात आल्यास सदर लाभधारकांकडून करावयाची वसुली महसूल यंत्रणेमार्फत करण्यात येवून आयुक्त कृषि यांच्या गार्फत शासनाकडे जमा करण्यात यावी.
शासन निर्णय PDF मध्ये असा
‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना राबविण्यास मान्यता












































































