Last Updated on 29 Oct 2022 3:31 PM by Sanjay Patil/Adhorekhit
‘सोशल-मिडीया’वर विचारपूर्वक फॉरवर्ड करा – पंतप्रधान
खोट्या बातम्यांचा प्रसार रोखण्यासाठी आपल्याला तांत्रिकदृष्ट्या प्रगती करावी लागेल
स्मार्ट तंत्रज्ञानाच्या मदतीने कायदा आणि सुव्यवस्थेत सुधारणा शक्य
नवी दिल्ली । देशातील युवावर्गाची दिशाभूल केली जाऊ नये यासाठी कोणत्याही प्रकारचा नक्षलवाद,मग तो बंदुकीच्या जोरावर असो किंवा लेखणीच्या,मुळापासून उखडून टाकणे गरजेचे आहे.अशा शक्ती येणाऱ्या पिढ्यांना बिघडविण्यासाठी त्यांचे बौद्धिक वर्तुळ वाढवित आहेत,असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.
हरियाणातील सूरजकुंड येथे सुरू असलेल्या दोन दिवसीय ‘चिंतन शिबिरात ते बोलत होते. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी देशातील सर्व राज्यांचे गृह सचिव, डीजीपी, सशस्त्र सेना दलाचे अधिकारी आणि केंद्रीय सुरक्षा दलाचे अधिकारी यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशाची सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्याचे आवाहन केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले,दहशतवादाचे पाळेमुळे खणून उद्ध्वस्त करण्याची गरज वारंवार व्यक्त करून प्रत्येक सरकारने आपापल्या क्षमता व समज वापरून त्यासाठी आवश्यक भूमिका पेलली पाहिजे असे पंतप्रधान म्हणाले. एकत्र येऊन परिस्थिती हाताळणे ही काळाची गरज आहे असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, “देशातील युवावर्गाची दिशाभूल केली जाऊ नये यासाठी कोणत्याही प्रकारचा नक्षलवाद, मग तो बंदुकीच्या जोरावर असो किंवा लेखणीच्या, मुळापासून उखडून टाकणे गरजेचे आहे.” अशा शक्ती येणाऱ्या पिढ्यांना बिघडविण्यासाठी त्यांचे बौद्धिक वर्तुळ वाढवित आहेत, असा इशारा पंतप्रधानांनी यावेळी दिला. सरदार पटेल यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेतून देशाची एकता, अखंडत्व टिकविण्यासाठी अशा शक्तींचा देशात प्रसार होऊ देता कामा नये असे म्हणून पंतप्रधानांनी सांगितले की या शक्तींना आंतरराष्ट्रीय पातळीवरून लक्षणीय मदत मिळते.
सोशल मिडीयाची शक्ती मोठी असून त्याला कमी लेखले जाऊ शकत नाही. परंतु, याठिकाणच्या कंटेनची विश्वासार्हता पडताळून पाहण आवश्यक आहे. त्यामुळे समाज माध्यमांवरील प्रत्येक गोष्टींवर विश्वास ठेऊ नये. तसेच कुठलीही गोष्ट फॉवर्ड किंवा पोस्ट करताना 10 वेळा विचार करावा असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पंतप्रधान म्हणाले की, सोशल मीडियाला कमी लेखले जाऊ शकत नाही आणि थोड्या प्रमाणात बनावट बातम्या देशात मोठा गोंधळ निर्माण करू शकतात. या काळात आरक्षणाबाबत पसरवलेल्या खोट्या बातम्यांमुळे देशाचे नुकसान झाले. सोशल मीडियावर मेसेज शेअर करण्यापूर्वी वस्तुस्थिती तपासण्याची गरज आहे.कायद्याचे पालन करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि अधिकारांसाठी नकारात्मक शक्तींविरुद्ध कठोर कारवाई करणे ही आपली जबाबदारी आहे. फेक न्यूजमुळे देशभरात वादळ येऊ शकते. कोणतीही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवण्यापूर्वी विचार केला पाहिजे, विश्वास ठेवण्यापूर्वी पडताळणी करावी लागेल असे त्यांनी सांगितले.
संदेश फॉरवर्ड करण्यापूर्वी ते सत्यापित करण्यासाठी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या विविध यंत्रणांबद्दल लोकांना जागरूक केले पाहिजे. फेक न्यूजचे तथ्य तपासणे आवश्यक आहे. यामध्ये तंत्रज्ञानाचा मोठा वाटा आहे. मेसेज फॉरवर्ड करण्याआधी लोकांना व्हेरिफाय करण्याच्या यंत्रणेची जाणीव करून दिली पाहिजे.सोशल मीडिया हे केवळ माहितीच्या स्रोतापुरते मर्यादित राहू नये, असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी देशात आरक्षणाच्या मुद्द्यावर पसरलेल्या गोंधळाचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, देशाला त्याचे परिणाम भोगावे लागले. सोशल मीडियावर कोणताही मेसेज फॉरवर्ड करण्यापूर्वी लोकांनी 10 वेळा विचार करावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.










































































