Last Updated on 05 Aug 2022 10:12 PM by Sanjay Patil/Adhorekhit
भारतीय प्रशासकीय सेवा अधिकाऱ्यांच्या 1472 आणि भारतीय पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या 864 जागा रिक्त
नवी दिल्ली |
देशातील नोकरशाहीतील सर्वोच्च सेवा आयएएस-आयपीएसची 2300 हून अधिक पदे रिक्त आहेत. केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. मंत्री जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी सांगितले की 1 जानेवारी 2022 पर्यंत विविध राज्यांमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत 1,472 आणि भारतीय पोलीस सेवेत 864 जागा रिक्त आहेत.
डॉ जितेंद्र सिंह या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाले की, बसवान समितीच्या शिफारशींच्या आधारे थेट भरती केलेल्या (DR) आयएएस अधिकाऱ्यांची संख्या योग्य प्रमाणात वाढविण्यात आली आहे.या समितीने अशी शिफारस देखील केली होती की 180 च्या वर ही संख्या वाढविण्यात आली तर a) गुणवत्तेशी तडजोड करावी लागेल; b)लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमी एलबीएसएनएए(LBSNAA) ची क्षमता ओलांडली जाईल आणि; c) यामुळे विशेष करून भारत सरकारमधील वरिष्ठ पदांच्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकार्यांच्या करिअरच्या बढती प्रक्रियेच्या अनुक्रमामध्ये यामुळे प्रश्न निर्माण होतील.
डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, 01.01.2022 पर्यंत विविध राज्यांमध्ये आयएएस अधिकाऱ्यांच्या 1472 आणि पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या 864 जागा रिक्त आहेत.ते पुढे म्हणाले की रिक्त पदे निर्माण होणे आणि भरणे ही निरंतर प्रक्रिया आहे.सर्व संवर्गातील रिक्त पदे भरण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) दरवर्षी आयएएस आणि आयपीएस श्रेणीत थेट भरतीच्या आधारावर रिक्त जागा भरण्यासाठी नागरी सेवा परीक्षा (CSE) आयोजित करते.
पदोन्नती कोट्यातील रिक्त जागा भरण्यासाठी, केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे राज्य सरकारांसह निवड समितीच्या बैठका घेतल्या जातात, अशी माहिती देखील डॉ.सिंह यांनी यावेळी दिली.
यासह सरकारने गुरुवारी संसदेत सांगितले की, विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये एकूण मंजूर पदांची संख्या 40,35,203 आहे आणि त्यापैकी 9,79,327 पदे रिक्त आहेत. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांतर्गत एकूण नियुक्त कर्मचार्यांची संख्या 30,55,876 आहे. एखादे पद दोन किंवा तीन वर्षांहून अधिक काळ रिक्त राहिल्यास, 12 एप्रिल 2017 च्या व्यय विभागाच्या आदेशानुसार ते पद रद्द करण्यात आले आहे असे मानले जाते.विशेष करून या सरकारी नोकऱ्या रेल्वे, पोस्ट, संरक्षण क्षेत्र आणि गृह खातं या विभागातील असतील.












































































