Last Updated on 07 Oct 2022 8:18 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । देशातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये (एपीएमसी) भारतातील गव्हाची गेल्या 12 वर्षातील उच्चांकी आवक झाली आहे.गेल्या वर्षी समान कालावधीत 1.44 मेट्रिक टन आवक झाली होती.या तुलनेत यामध्ये 57 टक्के वाढ होवून ही आवक 2.27 मिलियन मेट्रिक टन (एमटी) झाली आहे.मंडईंमध्ये गव्हाची आवक अशी वाढली आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात गव्हाची आवक होऊन गेल्या 12 वर्षांचा विक्रम मोडीत निघाला आहे.
अलिकडेच सरकारने देशात पुरेसा अन्नधान्य साठा असल्याचे जाहीर केले होते. आणि गहू, आटा, तांदूळ याच्या किमती नियंत्रणामध्ये असल्याचे म्हटले होते. मंत्रालयाने सांगितले की, गहू आणि तांदळाच्या घाऊक आणि किरकोळ किमतीमध्ये घसरण नोंदविण्यात आली आहे. आट्याच्या किमती स्थिर आहेत.. सरकारने सांगितले की, किमतीमधील वाढ रोखण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. गहू तसेच तांदूळ निर्यातीबाबत नियम लागू करण्यात आले आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत 57 टक्के वाढ
कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, यावर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात 2.27 दशलक्ष टन गव्हाची सरकारी गोदामांमध्ये आवक झाली आहे. जे मागील वर्षीच्या याच महिन्यांच्या तुलनेत 57 टक्के अधिक आहे. गतवर्षी याच महिन्यात मंडयांमध्ये 1.44 मेट्रिक टन गव्हाची आवक झाली होती. त्याचबरोबर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात गव्हाची आवक 2010 नंतर सर्वाधिक आहे. 2010 मध्ये याच महिन्यात 4.38 मेट्रिक टन गव्हाची आवक मंडईंमध्ये झाली होती.











































































