Last Updated on 04 Sep 2023 4:56 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । देववाडी (ता वाळवा) येथील श्रीमती रंजना उत्तम मोरे (वय ५० वर्षे) यांचे जटा निर्मूलन करण्यास महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना यश आले आहे.
श्रीमती मोरे यांच्या डोक्यात गेली दोन-तीन वर्षापासून जटा झाल्या होत्या.अंधश्रद्धेतून,अज्ञानातून त्यांच्या या जटा राहिल्या होत्या.इस्लामपुरात नाक,कान व घसा तज्ज्ञ डॉ.जितेंद्र लादे यांच्याकडे काही उपचार घेण्यासाठी श्रीमती मोरे आल्या होत्या.त्यावेळी डॉ लादे यांनी या बाबत विचारपूस केली,त्यांचे प्रबोधन केले,जटामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतात,अनेक अडचणी येतात,असे समजावून सांगितले,तसेच अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रबोधन केले,या पूर्वी केलेल्या जटा निर्मूलन व्यक्तींची छाया चित्रे दाखवली त्यामुळे श्रीमती मोरे जटा निर्मूलन करण्यास तयार झाल्या.
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे,जॉइंट ग्रुप ऑफ इस्लामपूरचे अध्यक्ष नितीन फल्ले,आरोग्य अधिकारी डॉ.दिपाली लादे, डॉ.जितेंद्र लादे, डॉ.प्रा.नितीन शिंदे निमिष लादे,अरबाज पटेल यांनी जटा निर्मूलन केले.
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने गेल्या ३४ वर्षात हजारो व्यक्तींचे जटा निर्मूलन केलेले आहे, जटाधारी व्यक्तीची माहिती संघटनेला कळवावी, सदर व्यक्तीचे प्रबोधन करून त्यांचे जटा निर्मूलन केले जाईल,असे आवाहन समितीने केले आहे,अधिक माहितीसाठी ९८५०८९९७१३ या क्रमांकावर संपर्क करावा.








































































