Last Updated on 04 Feb 2022 9:56 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली ।
कोविडसारख्या आपत्तीग्रस्त काळात जेव्हा संपूर्ण विश्वाने भयंकर संकटाचा सामना केला त्याच वेळेस, भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी संकटाला संधीत रुपांतरीत करण्यासाठी प्रयत्न करण्याची देखील सुरुवात झाली. विशेषकरून कृषी क्षेत्र तसेच लहान आणि माध्यम उद्योगांना आधार देण्यासाठी केंद्र सरकारने अनेक नवे उपक्रम देखील सुरु केले.
दूध उत्पादनाच्या क्षेत्रातील अमर्याद संधींचा विचार करून दुग्धप्रक्रिया सुविधा विकास निधीच्या अंतर्गत यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. वर्ष 2013-14 मध्ये देशात 137.6 दशलक्ष टन दुधाचे उत्पादन होत असे. त्यात वाढ होऊन वर्ष 2019-20 मध्ये 198.4 दशलक्ष टन इतके झाले आहे. वर्ष 2024 पर्यंत देशातील दूध उत्पादन 330 दशलक्ष टन होईल अशी शक्यता आहे. सध्या एकूण दूध उत्पादनाच्या केवळ 20 – 25% दूध प्रक्रियेसाठी वापरण्यात येते, हे प्रमाण वाढवून 40% पर्यंत नेण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
साभार । न्यू इंडिया समाचार











































































