Last Updated on 08 Sep 2024 6:27 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई | बॉलीवूडमधील लोकप्रिय कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. दिपीकाने आज मुलीला जम्न दिला आहे. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर दीपिका आणि रणवीरच्या घरी लक्ष्मीचा जम्न झाला आहे.
दीपिका पादुकोणननं फेब्रुवारी महिन्यात ती आई आणि रणवीर बाबा होणार असल्याची गोड बातमी शेअर केली होती. तेव्हा पासून दोघांच्याही चाहतावर्गात कमालीचा उत्साह पाहायला मिळत होता.
दोन दिवस आधी दीपिका आणि रणवीर हे मुंबईतील सिध्दिविनायक मंदिरात गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेले होते. गणरायाचा आशीर्वाद घेतल्यानंतर शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळेस दीपिकाबरोबर तिच्या कुटुंबातील इतरही सदस्य रूग्णालयात दाखल झाले होते.
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी 2018 मध्ये लग्न केले. त्यानंतर लग्नाच्या सहा वर्षांनंतर दीपिका बाळाला जन्म देत आहे. काही दिवसांपूर्वीच ती मुंबईमध्ये दाखल झाली. यावेळी दीपिका पादुकोण ही फोटोंसाठी पोझ देताना देखील दिसली होती.









































































