Last Updated on 17 Oct 2024 9:38 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे । दहावी बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही, असं स्पष्टीकरण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिलं आहे.
परिक्षांबाबत समाजमाध्यमांवर पसरलेली माहिती खोटी असून यावर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं. या परीक्षांची सविस्तर विषयनिहाय वेळापत्रकं मंडळाच्या www.maha-hssc-board.in या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येतील, अशी माहीती त्यांनी दिली आहे. अशी खोटी माहिती प्रसारित कऱणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.









































































