Last Updated on 26 Aug 2022 2:24 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली | सांगली जिल्ह्यातील एकूण तीन ताड़ी अनुज्ञप्तीचे ताडी वर्ष 2022-2023 (1 सप्टेंबर 2022 ते 31 ऑगस्ट 2023) या कालावधी करीता जाहिर ई लिलाव-नि-निविदा पध्दतीने दि. 25 ते 31 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर घेण्यात येणार आहे. इच्छुक बोलीदारांनी सदर संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करून घ्यावे.
तसेच जास्तीत जास्त बोलीदारांनी लिलावात भाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.
ई-लिलाव-निविदा प्रक्रियेच्या सर्व अटी, शर्ती व प्रक्रियेबाबतच्या अधिक माहितीसाठी www.mahatenders.gov.in व Sangli.nic.in या संकेतस्थळावर तसेच जिल्हाधिकारी सांगली कार्यालय. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सांगली कार्यालय व सर्व क्षेत्रीय निरीक्षक/ दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जि. सांगली कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.











































































