Last Updated on 11 Dec 2021 5:18 PM by Sanjay Patil/Adhorekhit
जर एखाद्या व्यक्तीला धन स्वास्थ्य, कुटुंबाशी संबंधि अडचणी, त्रास असेल तर ये काळ्या तिळाचे काही खास उपाय सांगण्यात येत आहेत. काळ्य तिळाचे हे उपाय केल्याने कुंडलीतील दोष दूर होऊ शकतात.शनीची साडेसाती,राहू-केतू दोष,कालसर्प दोष,पितृ दोष असेल तर काळ्या तिळाच्या या उपायांनी लाभ प्राप्त होऊ शकतो.
उपाय तांब्याच्या कलशामध्ये पाणी भरून काळे तीळ टाकावेत
नियमितपणे ब्रह्मममुहूर्तावर उठून स्नान केल्यानंतर एखाद्या महादेवाच्या मंदिरात जावे.दररोज महादेवाची विधिव्रत पूजा करावी.पूजेचा विधी माहिती नसल्यास दररोज तांब्याच्या कलशामध्ये पाणी भरून काळे तीळ टाकावेत.आता हे पाणी शिवलिंगावर ॐ नमः शिवाय मंत्राचा उच्चार करीत अर्पण करावे,जर तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप माहिती असेल तर जास्त लाभकारक राहील.हा उपाय नियमित करावा.पाणी अर्पण केल्यानंतर फुल आणि बेलाचे पान अर्पण करावे.या उपायाने लवकरच शुभफळ प्राप्त होऊ लागतील.
काळ्या तिळाचे दान केल्यानेही राहू-केतू आणि शनि संबंधित अशुभ योगांचा प्रभाव समाप्त होतो
प्रत्येक शनिवारी काळे तीळ,काळे उडीद काळ्या कपड्यात बांधून एखाद्या गरिबाला दान केल्यास पैशाशी संबंधित समस्या समाप्त होतात.दुधामध्ये काळे तीळ मिसळून हे दुध पिंपळाच्या झाडाला अर्पण केल्यास भाग्यहीन व्यक्तीसुद्धा भाग्यशाली बनतो.हा उपाय नियमित करणे आवश्यक आहे.
शनि आणि राहू-केतूच्या दोषातून मुक्त होण्यासाठी शनिवारी स्नानाच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून त्या पाण्याने स्नान करावे.तंत्र शास्त्रातील प्राचीन मान्येतेनुसार या उपायाने शनि दोषातून मुक्ती मिळते.
शनीची साडेसाती सुरु असेल तर या काळामध्ये एखाद्या पवित्र नदीमध्ये शनिवारी काळे तीळ प्रवाहित करा. या उपायाने शनि दोषांची शांती होते.












































































