Last Updated on 21 Jul 2023 11:10 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे । तलाठी भरतीसाठी सर्व प्रकारच्या उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी व ऑनलाईन शुल्क जमा करण्यासाठी २५ जुलै अखेर मुदतवाढ देण्यात आली आहे.
महसूल विभागातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी दि. 26 जून 2023 पासून उमेदवारांची नोंदणी व ऑनलाईन अर्ज स्विकृतीची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे.जाहिरातीत नमुद केल्यानुसार ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी व ऑनलाईन शुल्क भरण्याकामी दिनांक 18 जुलै 2023 रोजी 23.55 वा. पर्यंत मुदत देण्यात आलेली होती.
तथापि राज्यात सुरू असणाऱ्या अतिवृष्टीमुळे इंटरनेट सेवा प्रभावित झाल्याने दुर्गम भागातील (PESA क्षेत्रातील) व इतर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यास अडचणी निर्माण झाल्याबाबत निवेदन शासन स्तरावर प्राप्त झालेले आहेत.त्यामुळे तलाठी भरतीसाठी सर्व प्रकारच्या उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी व ऑनलाईन शुल्क जमा करण्याकामी पुढीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे.
दि. 22 जुलै 2023 पासून दि. 25 जुलै 2023 रात्री 23.55 वा.पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.
हेही वाचा – ऑटोरिक्षा,टॅक्सी चालकाने भाडे नाकारल्यास ‘अशी’ करा तक्रार
तलाठी भरतीसाठी यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.तसेच वरीलप्रमाणे दिलेली मुदतवाढ ही अंतिम असून यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे अप्पर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमि अभिलेख, पुणे यांनी कळविले आहे.
तलाठी पदासाठी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात परीक्षा होण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रातील सहा विभागाअंतर्गत येणाऱ्या 36 जिल्ह्यांतील चार हजार 644 पदांच्या भरती केली जाणार आहे.यामध्ये पुणे,नाशिक,नागपूर,औरंगाबाद,कोकण,तसेच अमरावती या विभागांचा समावेश आहे.सर्व जिल्ह्यातील तलाठ्यांची 4 हजार 644 पदे भरली जातील.
मुदतवाढीबाबतचे भूमि अभिलेख विभागाचे पात्र PDF मध्ये
अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्याबाबत- 3








































































