Last Updated on 05 Jul 2025 2:56 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने संपूर्ण देशात सर्वप्रथम आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे औषध फवारणी आणि मल्टी स्पेक्ट्रम ड्रोनसारखे अद्यावत तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे. जगातील आधुनिक तंत्रज्ञान आपल्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा माझा कायम प्रयत्न राहील,असा विश्वास राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष,युवा नेते प्रतिकदादा पाटील यांनी व्यक्त केला. ते वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी, मालेवाडी,भरतवाडी, कणेगाव, बहादूरवाडी येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद व संपर्क दौऱ्यात बोलत होते.
जेष्ठ संचालक प्रताप पाटील, शैलेश पाटील, हणमंत माळी,राजकुमार कांबळे, संचालिका डॉ.सौ.योजना शिंदे-पाटील, सचिव डी.एम. पाटील, बांधकाम अभियंता प्रेमनाथ कमलाकर, जलसिंचन अधिकारी जे.बी. पाटील, ऊस पुरवठा अधिकारी नितीन पाटील, गटाधिकारी संग्राम पाटील, विकास कदम या दौऱ्यात सहभागी झाले होते.
प्रतीक पाटील म्हणाले, लोकनेते राजारामबापू पाटील यांनी साखराळेच्या माळावर साखर कारखाना उभा करून वाळवा तालुक्याच्या विकासाला चालना दिली आहे. माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी साखर कारखान्याची प्रगती करताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित सातत्याने जपले आहे. गेल्या ५०-५५ वर्षापासून आपण व साखर कारखान्यात एक ऋणानुबंध निर्माण झाला आहे. तो जपण्याचा,वाढविण्याचा माझा अखंड प्रयत्न राहील.
यावेळी संचालक प्रताप पाटील, शैलेश पाटील, डॉ.योजना शिंदे-पाटील, तसेच नितीन पाटील यांनी माजी मंत्री आ.जयंत पाटील, प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या वतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यां साठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती देऊन या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
माजी संचालक भिमराव पाटील, माजी सभापती अँड.विश्वासराव पाटील, बँकेचे संचालक संभाजी पाटील, जेष्ठ कार्यकर्ते बाजीराव पाटील, माजी सरपंच विलासराव देसावळे, बाजीराव बेनाडे, संग्रामसिंह घोरपडे, मंगेश माने, माजी सरपंच रमेश पाटील, राजाराम पाटील, मालेवाडीच्या सरपंच अस्मिता खवरे, उपसरपंच राहुल पाटील, अनिता गुरव, भरतवाडीच्या सरपंच सोनाली निकम, उपसरपंच धनश्री निकम यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने या दौऱ्यात सहभागी झाले होते.












































































