Last Updated on 11 Dec 2023 9:53 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सेना ध्वजदिन निधीला साह्य करणारा राज्यातील पहिलाच पत्रकार संघ
ठाणे । जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी २०२३ संकलनाला ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाकडून सढळ हस्ते हातभार लावण्यात आला.पत्रकार संघाच्या वतीने सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी ११ हजारांचा धनादेश जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजळ जाधव (नि.) यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
याप्रसंगी, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी अशा प्रकारे निधी संकलनाला हातभार लावणारा राज्यातील हा पहिलाच पत्रकार संघ असून पत्रकारसंघाने उचललेले हे पाऊल समाजापुढे आदर्शवत असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाला ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, शहर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दीपक शेलार, सचिव निलेश पानमंद, खजिनदार विभव बिरवटकर, सहसचिव गणेश थोरात,सदस्य अमर राजभर, अनुपमा गुंडे आदींसह मनोज सिंह, अमोल कदम, रोहिणी दिवाण, विरेंद्र मिश्रा उपस्थित होते.










































































