Last Updated on 27 Jan 2022 12:16 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे |
ज्येष्ठ साहित्यिक आणि लेखक अनिल अवचट यांचे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते.अखेर आज सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली. त्यांच्या पश्चात विवाहित मुली मुक्ता आणि यशोदा, अन्य कुटुंबीय आणि मोठा मित्रपरिवार आहे.
डॉ. अनिल अवचट हे स्वतः पत्रकार असले तरी त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला नेहमीच नकार दिला.त्यांनी आपली पत्रकारिता नेहमीच गरिबी,अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली. डॉ. अनिल अवचट यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी विपुल लिखाण केले.
अनिल अवचट यांचे कार्य
अनिल अवचट यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे झाला. त्यांनी एम.बी.बी.एस ची पदवी पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून घेतली. महाविद्यालयीन जीवनात डॉक्टरांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला. १९६९ मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक ‘पूर्णिया’ प्रसिद्ध केले. तेव्हापासून अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले.अनिल अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक होते.त्यांनी पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची शोधलेली अनोखी पद्धती ही जगभरांतील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते.महाराष्ट्र राज्य व देशपातळीवर डॉ. अनिल अवचट यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे. लिखाणाप्रमाणेच त्यांचे सामाजिक कार्यही बहुआयामी आहे. अनिल अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक होते.
अनिल अवचट यांना मिळालेले सन्मान
व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्यासाठी भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते २०१३ साली राष्ट्रीय पुरस्कार
१३ जानेवारी २०१८ मध्ये अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार
महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार
२०१७ सालचा फर्ग्युसन गौरव पुरस्कार
“सृष्टीत.. गोष्टीत” या पुस्तकाला साहित्य अकादमीतर्फे उत्कृष्ट बालसाहित्याचा पुरस्कार
डॉ. अनिल अवचट यांची पुस्तके सलग तीन वर्षे महाराष्ट्र शासनाने “सर्वोत्कृष्ट पुस्तके” म्हणून जाहीर
अमेरिकेतील आयोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लेखकांच्या संमेलनात त्यांच्या साहित्याचा गौरव
सातारा येथील न्या. रामशास्त्री प्रभुणे प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा सामाजिक न्याय पुरस्कार
१४ नोव्हेंबर २०१० रोजी साहित्य अकादमी तर्फे प्रथम बाल-साहित्य पुरस्कार
२०११ मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार
डॉ. अनिल अवचट यांच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राला १२व्या पुलोत्सव सोहळ्यात पुल कृतज्ञता सन्मान २०१५ प्रदान
अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशन या संस्थेकडून साहित्य जीवन गौरव पुरस्कार








































































