Last Updated on 03 May 2023 6:49 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । महाराष्ट्र हे देशात जीडीपीच्या तुलनेत सर्वात कमी कर्ज असलेले राज्य ठरले आहे.विशेष म्हणजे थकीत कर्जाच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.देशातल्या ३१ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत जीएसडीपीच्या तुलनेत महाराष्ट्रावर सर्वाधिक कमी १७ पूर्णांक १ दशांश टक्के कर्ज आहे.
जम्मू-काश्मीवर सर्वाधिक ४८.८ टक्के कर्ज आहे.तर इशान्येकडील सर्व राज्य कर्ज मर्यादेच्या उंबरठ्यावर आहेत.उत्तर प्रदेशावर सर्वाधिक रुपयांचे थकीत कर्ज असून, तामिळनाडू तिसऱ्या स्थानी आहे.सर्व राज्यांनी वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन लागू केलेले असल्यामुळे त्यांना जीएसडीपीविषयक निकषांचे पालन करणे आवश्यक आहे.
अरुणाचल प्रदेश,मणिपूर, मेघालय त्रिपुरा आणि मिझोराम यांसह सर्व इशान्येकडील राज्ये कर्ज मर्यादेच्या उंबरठ्यावर आहेत.उत्तर प्रदेशवर सर्वाधिक ५.४९ लाख कोटी रुपयांचे थकीत कर्ज असून,जीएसडीपीच्या तुलनेत हे प्रमाण ३२.६ टक्के आहे.४.८० लाख कोटी रुपयांच्या कर्जासह महाराष्ट्र दुसऱ्या,तर ४.६२ लाख कोटी रुपयांच्या कर्जासह तामिळनाडू तिसऱ्या स्थानी आहे.तामिळनाडूच्या कर्जाचे जीएसडीपीच्या तुलनेतील प्रमाण २५.७ टक्के आहे.
दिल्लीवरील थकीत कर्जाचा बोजा अवघा ३,६३१ कोटी रुपये आहे.गोव्यावरील कर्ज बोजा २२,६४६ कोटी रुपये आहे.त्याचे जीएसडीपीच्या तुलनेतील थकीत कर्ज मात्र ३०.३ टक्के आहे.









































































