Last Updated on 26 Jan 2022 1:47 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली ।
आज देशभरात 73 वा प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या निमित्ताने देशभरात वेगवेगळे कार्यक्रम देखील पार पाडले जात आहेत. तर तिकडे उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि लडाखमध्ये 15 ते 17 हजार 500 फूट उंचीवर तैनात असलेल्या जवानांनीही पूर्ण उत्साहात तिरंगा फडकवला. आईटीबीपी जवान ज्यांना हिमवीर म्हटले जाते, त्यांनी उने 40°C तापमानात पूर्ण उत्साहात तिरंगा फडकवत प्रजासत्ताक दिवस साजरा केला.
यावेळी इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) आणि भारतीय सैन्याच्या जवानांनी भारत माता की जय! म्हणत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रसंग कोणताही असो, सीमेवर आपल्या संरक्षणासाठी सतत उभा असलेल्या आपल्या जवानांचा सार्थ अभिमान वाटतो. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयटीबीपीच्या जवानांनी लद्दाखमध्ये 15 हजार फूट उंचीवर उणे 40 डिग्री तापमानात तिरंगा फडकावला आणि राष्ट्रगीत गायले. यासोबतच हिमाचल प्रदेशात 16 हजार फूट उंचीवर तिरंगा फडकावत आयटीबीपीच्या जवानांनी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला.












































































