Last Updated on 23 Feb 2022 9:49 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त निनाईनगर (इस्लामपूर) येथे उभारण्यात आलेल्या स्व. आनंदराव पाटील (मालक) नगरीतील ‘जयंत कबड्डी प्रिमियर लिग’च्या तयारीची पहाणी युवा नेते प्रतिकदादा पाटील यांनी केली.
आज गुरुवारी ( दि.२४ फेब्रुवारी) सायंकाळी ५ वाजता युवा नेते प्रतिकदादा पाटील,युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते आणि अनेक मान्यवर व कबड्डी प्रेमींच्या उपस्थितीत लिगचे उदघाटन होणार आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांच्या हस्ते सोमवार (दि.२८ फेब्रुवारी) रोजी लिगचे बक्षिस वितरण होणार आहे. शिगाव (ता.वाळवा) चे सुपूत्र,शहीद भारतीय जवान रोमित चव्हाण यांच्या निधनाने ही लिग पाच दिवस पुढे ढकलली होती.जयंत स्पोर्ट्सचे संस्थापक,राष्ट्रीय खेळाडू खंडेराव जाधव (नाना) या लिगचे मुख्य संयोजक आहेत.
प्रतिकदादा पाटील यांनी निनाईनगर येथील जयंत स्पोर्ट्सच्या मैदानावर उभारलेल्या स्व.आनंदराव पाटील मालक नगरीची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
यावेळी मुख्य संयोजक खंडेराव जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, राज्य सरचिटणीस अरुण कांबळे,युवक शहराध्यक्ष सचिन कोळी,विजय देसाई (सोन्याबापू),जयंत स्पोर्ट्सचे अध्यक्ष सागर जाधव यांच्यासह कार्यकर्ते व खेळाडू उपस्थित होते.
सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ही लिग संपन्न होत असून प्रतिराज युथ फौंडेशन आणि कस्तुरी चॅरिटेबल ट्रस्टचे सहकार्य आहे. या लिगचे के न्यूज टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. महिलांची स्वतंत्र बैठक व्यवस्था केली आहे. जयंत स्पोर्ट्सच्या समोरच्या मैदानात चार चाकी गाड्यांचे तर मैदानाच्या पश्चिम बाजूच्या रस्त्यावर दोन चाकी गाड्यांचे पार्किंग केले जाणार आहे. किशोर गावडे (मुंबई), प्रसाद देशपांडे (राजारामनगर) हे सामन्यांचे समालोचन करणार आहेत. आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू नितीन मदने,राष्ट्रीय कबड्डीपटू विकास पाटील (कामेरी) या दोघांची तांत्रिक समिती स्थापन केलेली आहे.
वाळवा व शिराळा तालुक्यातील ७० किलो गटाखालील ८ संघ या लीगमध्ये खेळणार आहेत. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांचा राजारामबापू ईगल्स कासेगाव, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित पाटील स्व.जगदीश पाटील (आप्पा) रायडर्स कामेरी, आदिती उद्योग समूहाचे पृथ्वीराज पाटील यांचा आदिती पँथर्स ओझर्डे,रविंद्र पाटील (वाळवा) यांचा राजेंद्र पाटील युवा मंच फायटर्स,अतुल लाहिगडे (कासेगाव) यांचा शरद लाहिगडे हरिकन्स,सागर पाटील,संजय जाधव (जुनेखेड) यांचा स्फुर्ती रॉयल्स, राष्ट्रवादी काँग्रेसचे इस्लामपूर शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील यांचा जय हनुमान सहकारी नागरी पतसंस्था आणि शिराळ्याचे युवा नेते पृथ्वी नाईक यांचा शिराळा कोब्रा या संघांच्यामध्ये हे घुमसान होणार आहे.
जयंत स्पोर्ट्सचे अध्यक्ष सागर जाधव, कबड्डी संघटक विजय देसाई (सोन्या बापू), उमेश रासनकर,माजी नगरसेवक सदानंद पाटील,सचिन कोळी,शिवाजी पाटील,फिरोज लांडगे,आयुब हवलदार,अजय थोरात,किरण पाटील,अंकुश जाधव,अभिजित पाटील, संदीप कोळी यांच्यासह स्पोर्ट्सचे खेळाडू व कार्यकर्ते लिग यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.









































































