Last Updated on 31 Jul 2023 9:35 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पावसाने थोडीशी उघडीप दिल्यामुळे वाळवा तालुक्यातील बहे येथील कृष्णा नदी पुलाजवळ बघे,भाविक आणि मासेमारी करणाऱ्यांची गर्दी होती.
वाळवा तालुक्यातील बहे गावच्या उत्तरेस दोन किमी अंतरावर कृष्णा नदीवर पूल,बंधारा आहे.नदीच्या पात्रात रामलिंग बेट आहे.नदी पात्रातून बेटाकडे जाण्यासाठी रस्ता आहे.पूर आला की हा रस्ता पाण्याखाली जातो.
रविवारी सांयकाळी या परिसरात गर्दी होती.मक्याची कणसे विकणारे तेजीत होतें.पन्नासहुन अधिक मासेमारी करणारे पूल,बंधारा,नदीपात्र या परिसरात गळ टाकून बसले होते.

चपाती,कणिक,गांडूळ हे गळाला जोडून नदीत भिरकावीत होते.मध्येच ताजा मासा विकण्यासाठी ग्राहक चर्चा करीत होते.सकाळी अकरा वाजल्यापासून अंधार पडेपर्यंत मासेमारी चालते .
यातल्या काही तरुणांशी संवाद साधला असता ते म्हणाले, मासेमारी हा घाव डाव किंवा आंधळी शिकार आहे.जमलं तर जमतंय नाही तर उद्या परत यावं लागतंय.कृष्णा नदी वाहता वाहता परिसराला भरभरून देतेय हे मात्र खरं !
– संजय थोरात









































































