Last Updated on 22 Dec 2025 7:42 PM by Sanjay Patil/Adhorekhit
“जनसमर्थ” पोर्टलच्या सुविधामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणेकरिता आता बँकेत जाण्याची आवश्यकता नसून विनाकारण शेतकऱ्यांना कर्ज नाकारले जाणार नाही व कमीत कमी कालावधीत कर्ज मिळण्यास मदत होईल,
या ऑनलाईन प्रकियेकरिता कोणतेही शासकीय शुल्क आकारले जाणार नाही. याकरिता जिल्हा व तालुका प्रशासनाकडून मोहिम राबविण्यात येईल.
तसेच याबाबतचे वेळापत्रक तहसिलदार, तालुका कृषि अधिकारी, जिल्हा अग्रणी बँक तालुका प्रतिनिधी यांच्या समन्वयाने तयार करण्यात येईल. सदर अर्ज प्रकियेत सेतु केंद्र, महा ई-सेवा, ग्राहक सेवा केंद्र यांचाही सहभाग घेण्यात येईल.
तरी जास्तीत जास्त पात्र व गरजू शेतकऱ्यांनी जनसमर्थ पोर्टलवर पीक कर्ज मागणी अर्ज करुन किसान क्रेडिट कार्ड सुविधा उपलब्ध करुन घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद (भाप्रसे) यांनी केले आहे.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 14 Aug 2026 10:00 PM by Sanjay Patil/Adhorekhit विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात मोफत प्रवेश मार्गदर्शन केंद्र सुरू कराड । शिवनगर येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठ (रा... Read more















































































