Last Updated on 30 Apr 2024 9:55 PM by Sanjay Patil/Adhorekhit
गडचिरोली । छत्तीसगडच्या बस्तर इथं पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत किमान 10 नक्षलवादी ठार झाले आहेत. यामध्ये 3 महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे.
नारायणपूर जिल्ह्यातल्या अबुजमढ़च्या जंगलात नक्षलवाद्यांच्या शिरकावाची माहिती मिळाल्यानंतर राखीव दल तसंच विशेष पथक या ठिकाणी तैनात करण्यात आलं होतं. शोधमोहिमेदरम्यान काकूर आणि टेकामेटा गावांशेजारील जंगलात सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवाद्यांमध्ये गोळीबार झाला. या गोळीबारानंतर सुरक्षा यंत्रणांना 10 नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळाले. यासह एके 47 रायफल, इन्सास रायफल तसंच मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र आणि दारुगोळा ताब्यात घेण्यात आला,अशी माहिती पोलिसांनी दिली.









































































