Last Updated on 12 Aug 2024 8:55 PM by Sanjay Patil/Adhorekhit
‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमाची १३ ते १५ ऑगस्टदरम्यान अंमलबजावणी
सर्व इमारती व घरांवर तिरंगा लावण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचे आवाहन
पुणे | देशभरात १३ ते १५ ऑगस्टया कालावधीत दरवर्षीप्रमाणे ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) उपक्रम राबविण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले असून त्यानुसार सर्व शासकीय, निमशासकीय इमारती तसेच पुणे विभागातील नागरिकांनी आपल्या घरी राष्ट्रध्वज उभारुन मानवंदना द्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.
डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार- सर्व नागरिकांनी ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमात सहभागी व्हावे. सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी ते राहत असलेल्या शासकीय निवासस्थानी किंवा स्वत:च्या घरी १३ ते १५ ऑगस्टदरम्यान तिरंगा फडकवावा. घरी फडकविलेल्या राष्ट्रध्वजासोबत सेल्फी घेऊन कार्यालयप्रमुखांकडे पाठवावे.











































































