Last Updated on 29 Oct 2023 7:07 PM by Sanjay Patil/Adhorekhit
अधोरेखित ऑनलाइन डेस्क । गोटखिंडी (ता. वाळवा) येथील साद माणुसकीची सेवाभावी संस्थेच्या वतीने आज (रविवारी) गावातील सार्वजनिक स्मशानभूमीची साफसफाई करण्यात आली.
सफाईसाठी गावातील 25 नागरिकांनी सहभाग नोंदवला.त्यामध्ये दत्ताजीराव माने,डॉ.संजय थोरात दत्तात्रेय सूर्यवंशी,धनंजय थोरात,हायबती माळी,दत्तात्रय बोंगाणे,बाजीराव माळी,जयसिंग साळुंखे,प्रकाश पाटील मेहरबान अविनाश डवांग,दिलीप बापू (भडकिमकर ),दीपक शिंगटे, सुदाम पाटील,अण्णासाहेब देसाई,उदय भोईटे,धर्तरीनाथ जाधव,विजय लोंढे, नाना घारे,अरुण फाळके,रावसाहेब पाटील,मोहन जाधव,सुरेश येवले,शरद पाटील,पिंटू घारे आदी सहभागी झाले होते.
सहभागी सर्वांनी मान-अपमान न मानता खूप मेहनत घेऊन सार्वजनिक स्मशानभूमीची स्वच्छता केलेली आहे.एक सामाजिक काम आहे आणि ते आपल्या सर्वांची जबाबदारी आहे या उदात्त हेतूने साद माणुसकीची या संस्थेच्या अशा उपक्रमात अनेकजण सहभागी होत आहेत.












































































