Last Updated on 03 Oct 2022 8:11 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना यासंबंधी निवडणूक प्रचाराच्या कालखंडात एकूण तीन वेळा वृत्तपत्रांमध्ये आणि वृत्त वाहिन्यांवरून जाहीर माहिती द्यावी लागेल.ज्या राजकीय पक्षाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराला आपल्या पक्षाची उमेदवारी दिली असेल, त्या पक्षाला देखील त्यासंबंधीची माहिती एकूण तीन वेळा वृत्तपत्रांमध्ये व वृत्त वाहिन्यांवरून आणि आपल्या संकेतस्थळावर जाहीर करावी लागेल.
निवडणूक आयोगाने महाराष्ट्र,बिहार,हरियाणा,तेलंगणा,उत्तर प्रदेश आणि ओडिशा इथल्या रिक्त विधानसभा मतदारसंघाच्या जागा भरण्यासाठी जाहीर केलेल्या पोटनिवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने जाहीर केलेल्या अधिसूचनेत हे जाहीर करण्यात आले आहे.
आयोगाने दिनांक 16 सप्टेंबर 2020 च्या पत्र क्रमांक 3/4/2019/SDR/Vol. IV नुसार निर्देश दिले आहेत की नमूद केलेला कालावधी खालीलप्रमाणे तीन टप्प्यांसह निश्चित केला जाईल, जेणेकरून मतदारांना अशा उमेदवारांच्या पार्श्वभूमीबद्दल जाणून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल:
अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीआधीच्या पहिल्या चार दिवसात दरम्यान.अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीआधीच्या ९ व्या दिवसापासून ते प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत (मतदानाच्या तारखेच्या अगोदरचा दुसरा दिवस) (उदाहरणार्थ : जर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख महिन्याच्या 10 तारखेला असेल आणि मतदान महिन्याच्या 24 तारखेला असेल, तर महिन्याच्या 11 ते 14 तारखेच्या दरम्यान पहिल्यांदा गुन्हेगारी पार्श्वभूमीविषयीचे निवेदन जाहीर केले जाईल दुसरे आणि तिसरे निवेदन अनुक्रमे त्या महिन्याच्या अनुक्रमे 15 आणि 18 तारखेच्या दरम्यान आणि 19 आणि 22 तारखेच्या दरम्यान असेल.)












































































