Last Updated on 10 Mar 2024 10:33 AM by Sanjay Patil/Adhorekhit
जिल्हाधिकाऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा
महसूल अधिकाऱ्यांना वाहनांचे लोकार्पण
सातारा । जिल्ह्यात राज्यात प्रथमच महसूल विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या स्कॉर्पिओ वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांना देखील ईनोवा गाड्या देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
मल्हारपेठ पोलीस स्टेशन प्रशासकीय इमारत व निवासस्थानांचे निवासस्थानांचे ई-लोकार्पण
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मल्हारपेठ पोलीस स्टेशन प्रशासकीय इमारत व निवासस्थानांचे तसेच पाटण पोलीस स्टेशन येथील अधिकारी-कर्मचारी यांच्या निवासस्थानांचे ई-लोकार्पण करण्यात आले.यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई,जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, रविराज देसाई,जयराज देसाई, उपविभागीय अधिकारी सुनील गाडे,जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी,पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







































































