Last Updated on 03 Feb 2025 5:38 PM by Sanjay Patil/Adhorekhit
बीड । जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जिल्ह्यातील ११ सरपंचासह ४०२ जणांचे सदस्यत्व रद्द केले आहे. २० जानेवारी रोजी जिल्ह्यात ७ तालुक्यातील १३ सरपंच व ४१८ सदस्यांचं सदस्यत्व रद्द केले होते. त्यानंतर आता पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांनी ४ तालुक्यातील ११ सरपंचासह ४०२ जणांचे सदस्यत्व रद्द केले आहे.
जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागास प्रवर्गासाठीच्या राखीव असलेल्या जागांवर निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीला जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र निवडून आलेल्या दिनांकांपासून बारा महिन्यांच्या कालावधीत सादर करणे आवश्यक आहे.
मात्र २०२० ते २०२५ या कालावधीत झालेल्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर केले नाहीत. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
Courtesy: Prasar Bharati
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 31 Aug 2026 9:56 PM by Sanjay Patil/Adhorekhit नियमावलीचे पालन करणे बंधनकारक सांगली | सांगली जिल्ह्यातील सर्व कॅफे शॉप (कॉफी कॅफे/हॉटेल) अशा तत्सम आस्थापनांना जिल्हाद... Read more













































































