Last Updated on 28 Feb 2023 6:49 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश
कोल्हापूर । गुंगीकारक औषधांच्या (Shedule Drugs X, H, H1 आणि Inhaler) अवैध विक्रीवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व किरकोळ औषध दुकान चालकांनी त्यांच्या औषध दुकानांमध्ये एक महिन्याच्या आत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
सी.सी.टी.व्ही.कॅमेऱ्याचे फुटेज आवश्यकतेप्रमाणे औषध निरीक्षक, बालकल्याण पोलीस अधिकारी आणि शासनाने अथवा जिल्हादंडाधिकारी यांनी नियुक्त केले अधिकारी/कर्मचारी यांना पडताळणीसाठी उपलब्ध करुन देणे बंधनकारक असून या बाबींचे पालन करुन घेणेची जबाबदारी सहायक आयुक्त (औषधे) अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, कोल्हापूर यांची राहील.
आदेशाची जिल्ह्यातील कोणत्याही किरकोळ औषध विक्रेत्याने उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायद्यातील तरतुदींप्रमाणे आवश्यक ती दिवाणी अथवा फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येईल, असेही प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.












































































