Last Updated on 22 Nov 2023 4:53 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । ऊसदर प्रश्नी मुंबई येथे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बुधवारी मंत्रालयात बोलावलेली बैठक निष्फळ ठरली या बैठकीत कोणताच तोडगा निघालेला नाही.ही बैठक निष्फळ ठरली आहे.दरम्यान,मागील हंगामातील तुटलेल्या उसाला 400 रुपयेऐवजी 100 रुपये तरी कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावेत,अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.सायंकाळी 8 वाजेपर्यंत निर्णय न झाल्यास उद्याच्या आंदोलनावर ठाम असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.
मंत्रालयात झालेल्या बैठकीला सहकारमंत्री ना दिलीप वळसे पाटील साखर आयुक्त फुळखंडवर,साखर संघाचे व्यवस्थापक भालचंद्र खताळ प्रदेश अध्यक्ष प्रा जालिंदर पाटील,जिल्हाध्यक्ष महेश खराडे,जनार्दन पाटील,संदीप राजोबा प्रकाश आवाडे,गणपतराव पाटील,माधवराव घाटगे आदीसह अन्य उपस्थित होते. माजी खा राजू शेट्टी कोल्हापूर येथून व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सहभागी झाले होते
दरम्यान,कोल्हापूर येथे शिरोली पंचगंगा पुलाजवळ गुरुवारी राष्ट्रीय महामार्ग बेमुदत रास्ता रोको आंदोलन होणारच असा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे.
दरम्यान, या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना एक नव्हे,तर तीन पावले मागे येऊन मागील हंगामातील तुटलेल्या ऊसाला 400 रुपयेऐवजी 100 रुपये तरी कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावेत,अशी मागणी केली.सायंकाळी 8 वाजेपर्यंत निर्णय न झाल्यास उद्याच्या आंदोलनावर ठाम असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.
हेही वाचा – ऊसदर आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सुरु : ‘स्वाभिमानी’चे भागवत जाधव यांचा आरोप
ते पुढे म्हणाले की, यापेक्षा एक रुपया कमी घेणार नाही.पण आता कोणत्याही परिस्थितीत उद्याचे बेमुदत आंदोलन मागे घेणार नाही.जर कारखानदार मुंबईतून येताना पैसे देण्यास तयार झाले,तर उद्याच्या आंदोलनाबाबत विचार करू,असेही त्यांनी सांगितले.काही साखर कारखाने कामगारांना आंदोलनाला पाठवत आहेत.म्हणजे शेतकरी आणि कामगार यांच्यात संघर्ष लावत आहेत.हसन मुश्रीफ आणि बंटी पाटील यांनी कारखानदार यांना एकत्र केले आहे.आम्ही सरकार आणि कारखानदार यांना निर्णय मागे घ्यायला आम्ही भाग पाडू, असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान प्रा जालिंदर पाटील म्हणाले,आमची गत वर्षीची मागणी 400 रुपयाची होती.त्यातील 100 रुपये कारखानदारांनी द्यावेत उर्वरित 300 राज्य शासनाने द्यावेत.एस ए पी म्हणजेच statu tari advisary price म्हणजेच किमान आधारभूत किंमत म्हणून शासनाने पंजाब सरकारप्रमाणे द्यावेत अशी मागणी करत आहोत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गेल्या दीड महिन्यापासून पश्चिम महाराष्ट्रात मागील वर्षी तुटलेल्या उसाचे 400 रुपये आणि चालू हंगामात ऊसाला 3500 रुपये दर द्यावा, या मागणीसाठी तीव्र आंदोलन पुकारण्यात आले आहे.










































































