सांगली । महाराष्ट्राचे सत्ताधारी शिंदे सरकारला रक्ताचा नैवेद्य लागतो का? असा सवाल करून ऊस दरवाढ प्रश्नी सरकारचे तोंडावर बोट असल्याचा संतप्त सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भागवत जाधव,जिल्हाध्यक्ष महेश खराडे,संदीप राजोबा पोपट मोरे,संजय बेले यांनी केला.
जाधव म्हणाले की,मा.खा. राजु शेट्टी यांचे गेल्या महिनाभरापासून ऊस आंदोलन सुरू आहे,राज्यभरातील कार्यकर्त्यांते आंदोलनात सहभागी होत आहेत तरीही कारखान्यादार व शासन तोडगा काढण्यासाठी तयार नाहीत.उलट आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सुरू आहे.यावर्षी साखरेचा भाव सरासरी ३६४० रुपयांच्या पुढे विक्री केली त्याबरोबर उपपदार्थ चांगल्या भावाने विक्री साखर कारखान्यानी केली.ऊस उत्पादकात शेतकऱ्यांचे खते, औषधे, तणनाशके मजुर यांचे ३२ टक्के वाढ झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेन ३५०० रूपये पहिला हप्ता गतवर्षी तुटलेल्या ऊसाला ४०० रुपयेची मागणी केली असताना कारखान्यादार बोलायला तयार नाहीत.
ते म्हणाले,महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माळेगाव साखर कारखान्याचे ११.३४ रिकवरी असताना ३४४० रुपये प्रतिटन दिले आहेत माळेगाव कारखाना काय ब्राझील देशांमध्ये मध्ये आहे का? महाराष्ट्राचे सरकार नुसती बघ्याची भूमिका घेत असेल तर आम्ही शांत बसणार नाही.गेल्या दोन महिन्यांपासून गांधीगिरी मार्गाने आंदोलन सुरू केले.निर्णय झाल्यास भगतसिंग मार्ग आम्हाला अवलंवा लागेल.
राज्य सरकार साखरेवर विविध प्रकारचे कर लावणे,साखरेच्या आयात-निर्यात धोरणात हस्तक्षेप करते मग सोयीच्या गोष्टीत सरकार हस्तक्षेप करते.मग ऊसदर काळात क्षेयवादीसाठी आंदोलनाच्या काळात हस्तक्षेप का करत नाही,मराठा आंदोलक मनोज जिरागे-पाटील यांचे मराठा आरक्षणाचा आंदोलनाचा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला पण तो महाराष्ट्र सरकारांच्या अंगलट आला होता हे सुद्धा पोलिस प्रशासनाने लक्षात घ्यावे,असा इशारा त्यांनी दिला.