Last Updated on 22 Jul 2024 1:49 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोल्हापूर । आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या स्वयं माहिती प्रणालीत मान्सून काळात जिल्ह्यातील सद्यस्थितीबाबत माहिती whats app वर मिळू शकते.कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी 9209269995 हा मोबाईल क्रमांक कोल्हापूर हेल्पलाईन म्हणून सेव्ह करावा, व्हॉटसअप वरुन या नंबरवर 1 ते 6 पैकी क्रमांक मेसेज करावेत. यावर पाऊस, धरण पाणी पातळी, रस्ते, इ. बाबतची सर्व माहिती मिळणार आहे.
उदा. आपल्याला पर्जन्यमानाबाबत माहिती हवी असेल तर 1 असा रिप्लाय करा.
1. पर्जन्यमान (Rainfall)
2. धरण व पाणी पातळी अहवाल (Water Level Information)
3. पंचगंगा पाणी पातळी (Panchaganga River Water Level)
4. महत्वाचे संदेश (Important Messages)
5. आपत्कालीन संपर्क क्रमांक (Emergency Contact)
6. रस्ते व वाहतूक (Road and Transport)
7.पुर पातळी नुसार पाणी भागात येण्याची संभाव्य ठिकाणे…










































































