Last Updated on 25 Nov 2023 11:23 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोल्हापूर । इचलकरंजी येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना लिज युनिट श्री रेणुका शुगर्स कारखान्याने सन 2023-2024 या गळित हंगामात गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन 3300 रुपये एकरकमी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.तुटलेल्या ऊसाला आणि चालू हंगामातील दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या दोन महिन्यांपासून केलेल्या संघर्षाला यश आले आहे.
राज्यातील सर्वाधिक पहिली उचल देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखान्याने जाहीर केली आहे.स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर संभूशेटे यांच्या नेतृत्वाखाली पंचगंगा साखर कारखान्यांमध्ये दिवसभर ठिय्या आंदोलन करण्यात आले. तसेच परिसरातील सर्व ऊस तोडी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बंद पाडल्या होत्या.आंदोलनानंतर रेणुका शुगर च्या प्रशासनाने यंदाची पहिली उचल 3300 रूपये जाहीर केली.राज्यात उच्चांकी पहिली उचल 3300 रूपये जाहीर केली.एफआरपी पेक्षाा 106 रूपये अधिक दर पंचगंगा साखर कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी सी. एस. पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला लेखी पत्र असल्याची माहिती स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर संभूशेटे यांनी दिली.त्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेतले.
दरम्यान,23 नोव्हेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शिरोली पुलावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले.9 तासाच्या चक्काजाम आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मागील हंगामातील १०० रूपये तसेच यंदाच्या गळीत हंगामात एफआरपी अधिक 100 रूपये पहिली उचल जाहीर केली.
देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना लिज युनिट श्री रेणुका शुगर्सने प्रसिद्धीस दिलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, सर्व ऊस पुरवठादार शेतकरी बंधू व भगिनिंना कळविणेत येते की, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना लि, लिज युनिट ऑफ श्री रेणुका शुगर्स लि, या कराखान्याने सन 2023-2024 या चालू गळीत हंगामामध्ये येणा-या ऊसासाठी उच्चांकी दर रूपये तेहतिसशे प्रति टन (3300/- प्रति टन) एक रक्कमी विनाकपात देणेचा निर्णय श्री रेणूका शुगर्स लि, च्या प्रशासनाने घेतला आहे.चालू गळीत हंगामाचा कालावधी फारच कमी असलेने सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतक-यांनी आपला सर्व ऊस कारखान्यास पाठवावा असे आवाहन देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना लि, गंगानगर इचलकरंजी व श्री रेणूका शुगर्स लि, च्या प्रशासनाने केले आहे.













































































