Last Updated on 26 May 2025 12:29 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोल्हापूर । जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सरासरी ४५.४ मि.मी. (मागील २४ तासात) पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात १०२.४ मि.मी. इतका झाला आहे. भुदरगडमध्ये ६१.९ मि.मी., कागलमध्ये ६०.६ मि.मी., आजरामध्ये ५१.५ मि.मी., गडहिंग्लजमध्ये ५०.२ मि.मी., आणि शाहुवाडीत ५०.० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
राधानगरी (४८.२ मि.मी.) आणि करवीर कोल्हापूर (४५.८ मि.मी.) या तालुक्यांमध्येही सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. हातकणंगले (३३.२ मि.मी.), चंदगड (३५.२ मि.मी.), पन्हाळा (३३.९ मि.मी.) आणि शिरोळ (२६.१ मि.मी.) या तालुक्यांमध्ये तुलनेने कमी पावसाची नोंद झाली आहे.

स्रोत : जिमाका, कोल्हापूर











































































