Last Updated on 19 Jul 2024 2:50 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोल्हापूर | जिल्ह्यातील राधानगरी धरणात 5.56 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, न्हावेली, उमगाव व कोकरे, वेदगंगा नदीवरील- म्हसवे, शेणगाव, गारगोटी, निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, चिखली व सुळकुड, हिरण्यकेशी नदीवरील – साळगांव, विलजी व ऐनापूर, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड व सिध्दनेर्ली, कडवी नदीवरील- भोसलेवाडी, कोपार्डे, शिरगाव, सवते सावर्डे व सरुड पाटणे, वारणा नदीवरील -चिंचोली, तांदूळवाडी, कोडोली, माणगाव व खोची, भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व शिरगाव, कुंभी नदीवरील- कळे, शेनवडे, मांडुकली व सांगशी, कासारी नदीवरील- येवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कांटे, वालोली, बाजार भोगाव,पेंडाखळे, करंजफेण, कुंभेवाडी व सुसकेवाडी, धामीण नदीवरील- सुळे, पनोरे, आंबर्डे व गवशी, घटप्रभा नदीवरील- हिंडगाव, कानडे-सावर्डे, आडकुर, तारेवाडी व कानडेवाडी असे एकूण 65 बंधारे पाण्याखाली आहेत.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 5.56 टीएमसी, तुळशी 2.16 टीएमसी, वारणा 22.36 टीएमसी, दूधगंगा 12.93 टीएमसी, कासारी 1.96 टीएमसी, कडवी 2.09 टीएमसी, कुंभी 1.57 टीएमसी, पाटगाव 2.97 टीएमसी, चिकोत्रा 0.74 टीएमसी, चित्री 1.50 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, आंबेआहोळ 1.11 टीएमसी, सर्फनाला 0.39 टीएमसी व कोदे लघु प्रकल्प 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 29.8 फूट, सुर्वे 29.8 फूट, रुई 58.8 फूट, इचलकरंजी 54.6 फूट, तेरवाड 49 फूट, शिरोळ 38 फूट, नृसिंहवाडी 36 फूट, राजापूर 25.3 फूट तर नजीकच्या सांगली 11 फूट व अंकली 15.11 फूट अशी आहे.












































































