Last Updated on 07 Jun 2023 6:09 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । कोयना धरणात फक्त 13 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.सुमारे 105.25 टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणाऱ्या कोयना धरणात सध्या 13.23 टीएमसी पाणीसाठा आहे.
धरणातील पाणीसाठ्याचे वाटप लवादाच्या निर्देशाप्रमाणे केले जाते. पाणी वाटपाचे तांत्रिक वर्ष 1 जूनपासून सुरू झाले आहे. या तांत्रिक वर्षात पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी 67.50 टीएमसी पाणीसाठा आरक्षित झाला आहे.
धरणातील पाणीसाठा पूर्वेकडील सिंचन प्रकल्पासाठी आरक्षित केल्यामुळे धरणातील पाण्यावरून सिंचन व वीज प्रकल्पात कमतरता भासत आहे. कोयना प्रकल्पाने महानिर्मिती कंपनीला वीजनिर्मितीसाठी कमी प्रमाणात पाणीसाठा वापरावा, असे लेखी पत्र महानिर्मिती कंपनीला दिले आहे.
धरण पाणी साठा








































































