Last Updated on 06 Aug 2024 11:53 AM by Sanjay Patil/Adhorekhit
News Update Date : 06 August 2024, 11.05 AM
सातारा । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन आठवड्यापासून मुसळधार पाऊस कोसळत होता.कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने पाण्याची आवकही घटली आहे.त्यामुळे आज (6 ऑगस्ट) सकाळी 8 वाजता कोयना धरणाच्या सांडव्यावरून होणारा विसर्ग बंद करण्यात आला आहे.आता फक्त धरण पायथा विद्युत गृहामधील 2 हजार 100 क्युसेक्स विसर्ग कोयना नदीमध्ये सुरू असणार आहे.
सध्या धरणात 26 हजार 638 क्युसेक आवक होत आहे. धरणातून सोडण्यात आलेला 50 हजार क्युसेक विसर्ग कमी करुन,तो 40 हजारवर करण्यात आला आहे.त्यानंतर सोमवारी सायं 5 वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 5 फुटांपर्यंत खाली करून सांडव्यावरून 30 हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आले.तसेच रात्री 8 वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 4 फुटांपर्यंत खाली करून सांडव्यावरून 20 हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात येत होता.त्यानंतर आता आज (6 ऑगस्ट) सकाळी 8 वाजता कोयना धरणाच्या सांडव्यावरून होणारा विसर्ग बंद करण्यात आला आहे.
त्यामुळे कृष्णा-कोयना नद्यांच्या पाणी पातळीत घट होणार आहे.त्यामुळे नदीकाठी पुरापासून दिलासा मिळाला आहे.
मंगळवारी (6 ऑगस्ट) सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना धरणामध्ये साधारण 53 मिलिमीटर, नवजा येथे 94 मिलिमीटर तर महाबळेश्वर येथे 59 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
एक जूनपासून आतापर्यंत कोयनेत 4 हजार 174 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर नवजा येथे आतापर्यंत 4 हजार 867 आणि महाबळेश्वरमध्ये 4 हजार 630 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
कोयना धरण
दि.06/08/2024.वेळ:सकाळी 08:00 वाजता
पाणीपातळी:2147’11″(654.685मी)
पाणीसाठा:86.04 टीएमसी(81.75%)
आवक:- 26,638 क्यूसेक्स
पायथा ग्रहातून 2100 क्यूसेक्स विसर्ग कोयना नदीपत्रात सुरु आहे
पाऊस मि मी (आज/एकूण)
कोयना 53/4174
नवजा 94/4867
महाबळेश्वर 59/4630

News Update Date : 06 August 2024, 11.05 AM







































































