Last Updated on 08 Jun 2023 7:59 AM by Sanjay Patil/Adhorekhit
कुस्तीपटूंच्या समर्थनात इस्लामपुरात राष्ट्रवादीचे आंदोलन
सांगली । भाजपाचे केंद्र सरकार जनतेच्या प्रश्नावर,सामान्य माणसांच्या आंदोलनाबाबत असंवेदनशील आहे.त्यांनी शेतकरी आंदोलन चिरडण्याचा आटोकाट प्रयत्न केला,मात्र अखेर त्यांना शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावे लागले.त्याप्रमाणे महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनातही त्यांना माघार घ्यावी लागणार असल्याचे भाष्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी इस्लामपूर येथील आंदोलनात केले.
कुस्ती फेडरेशनचे माजी अध्यक्ष,भाजपा खा.ब्रिजभूषण सिंहला तात्काळ अटक करून त्याच्यावर पोक्सो कायदांतर्गत कडक कारवाई करा. कुस्ती आणि क्रांतिकारी लढ्याची मोठी परंपरा असणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते महिला कुस्तीपटूंच्या पाठीशी पहाडासारखे उभा राहतील,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी कार्यकर्त्यांनी ब्रिजभूषण सिंह व भाजपाच्या विरोधातील घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात,आणि महिला कुस्तीपटूंच्या समरणार्थ तीव्र आंदोलन केले. आ.जयंतराव पाटील यांनी इस्लामपूर येथील कचेरी चौका तील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी होऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. युवा नेते प्रतिकदादा पाटील, आष्टयाचे वैभव शिंदे,महाराष्ट्र केसरी आप्पासो कदम,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,शहराध्यक्ष शहाजी पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते नजरुद्दीन नायकवडी,आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक आनंदराव धुमाळ,पै.विकास पाटील, पै.विकास पाटील,पै.अशोक मोरे,भारतश्री किरण शिंदे,कामगार केसरी प्रा.नितीन शिंदे, पै.कुंडलिक गायकवाड,पै.संग्राम जाधव यांच्यासह कुस्तीपटूं,खेळाडू उपस्थित होते.
पै.आप्पासो कदम म्हणाले,ब्रिजभूषण गेल्या १५ वर्षापासून फेडरेशनचा अध्यक्ष आहे. त्याने कुस्ती वाढविण्याचे नव्हे,कुस्ती संपविण्याचे काम केले. देशातील कुस्तीपटूं सह सर्व खेळाडू,प्रशिक्षक व पालकांनी महिला कुस्तीपटूंच्या पाठीशी उभा राहूया.
पै.आनंदराव धुमाळ म्हणाले,या महिला कुस्तीपटूंच्या कुटुंबियांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. या महिलांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जागतिक पदक आणून आपल्या देशाची मान उंचावली आहे. त्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही.
पै.विकास पाटील म्हणाले,देशाचे पंतप्रधान एका बाजूला म्हणतात,बेटी पढाव,बेटी बचाव. मात्र गेल्या दीड-दोन महिन्यांपासून दिल्लीतील जंतर-मंतरला आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटूना भेटायला त्यांना वेळ मिळाला नाही. महिलांच्या बद्दल दृष्टीकोन योग्य नाही. प्रा.नितीन शिंदे यांनी आ. जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाच्या ठणगीचा वणवा करूया,अशी भावना व्यक्त केली. भारतश्री किरण शिंदे यांनी शरीर सौष्ठव संघटनेचा,जेष्ठ मल्ल माणिक जाधव यांनी कुस्तीगीर संघटनेचा पाठिंबा व्यक्त केला.
राष्ट्रवादीचे राज्य सरचिटणीस अरुण कांबळे,इस्लामपूर शहराध्यक्ष शहाजी पाटील,महिला राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव,शहराध्यक्षा रोझा किणीकर,शंकरराव चव्हाण,युवक आष्टा शहराध्यक्ष शिवाजी चोरमुले यांनी भाजप सरकारच्या विरोधात तीव्र भावना व्यक्त करून ब्रिजभूषणला तात्काळ अटक करण्याची मागणी केली.
याप्रसंगी नेताजीराव पाटील,पै.भगवान पाटील,विश्वनाथ डांगे,सुरेंद्रदादा पाटील,सुभाषराव सुर्यवंशी,अरुणाकाकी पाटील,बी.के.पाटील,बाळासाहेब पाटील,संजय पाटील,आनंदराव पाटील,खंडेराव जाधव, संदीप पाटील,माणिक पाटील (बोरगाव), पोपट पाटील (सर),मानसिंग पाटील,सचिन कोळी, स्वरूप मोरे,विलास आवटी, संजय काका पाटील,शैलेश पाटील,अविनाश खरात, संजय पाटील धनी, महादेव पाटील,कमल पाटील, सुनील मलगुंडे,सर्जेराव देशमुख, विशाल सुर्यवंशी,प्रियांका साळुंखे,शैलेश सुर्यवंशी, संजय जाधव,आयुब हवलदार, हमीद लांडगे,शकील मुजावर,भूषण शहा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते,तसेच कुस्तीसह विविध खेळाचे खेळाडू, प्रशिक्षक व पालक उपस्थित होते.









































































