Last Updated on 18 Jan 2024 8:05 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली | 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेविषयी कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेली उत्साह भावना आणि त्या सोहळ्यात सहभागी होण्याच्या मागणीला प्रतिसाद देत केंद्र सरकारने देशातील केंद्र सरकारच्या आस्थापना अर्धा दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.
केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार देशभरातील सर्व केंद्र सरकारी कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक आस्थापना दुपारी 2.30 वाजेपर्यंत अर्धा दिवस बंद राहतील.
अयोध्येत होत असलेल्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासोबतच त्याच वेळी भारतात आणि परदेशात विविध ठिकाणी विविध संघटना आणि समुदायांनी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
या संपूर्ण सोहळ्याच्या थेट प्रसारणाची व्यवस्था राष्ट्रीय प्रसारक दूरदर्शनने केली आहे, जे प्रसारण विविध खाजगी टीव्ही वाहिन्यांवरूनही थेट दाखवले जाणार आहे. अयोध्येतील सोहळ्याचे थेट प्रसारण मोठ्या पडद्यांवर पाहण्यासाठी भारतात आणि परदेशात सार्वजनिक ठिकाणी देखील व्यवस्था करण्यात आल्या आहेत.










































































