Last Updated on 18 Mar 2024 9:30 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले आहेत. आयोगानं गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश तसंच उत्तराखंड या ६ राज्यांचा गृह सचिवांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत.
आयोगानं बृहन्मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल तसंच अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त यांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत.
मिझोराम आणि हिमाचल प्रदेशाच्या सामान्य प्रशासनिक विभागाच्या सचिवांची बदली करण्याचे आदेशही आयोगानं दिले आहेत.
पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकांना हटवण्यासाठी कारवाई करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत.












































































