Last Updated on 11 Nov 2022 1:42 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । शिवनगर येथील यशवंतराव माहिते कृष्णा साखर कामगार सहकारी सेवा संस्थेच्या (कामगार सोसायटी) अध्यक्षपदी यासिन दस्तगीर संदे (रेठरे बुद्रुक) तर उपाध्यक्षपदी अनंत मारुती बारटक्के (नरसिंहपूर) यांची बिनविरोध निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी एस.एस.सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी पार पडल्या.या संस्थेची वार्षिक उलाढाल 2 कोटी रुपये आहे. खेळते भागभांडवल 5.50 कोटी रुपये आहे.तर ठेवी सुमारे 64 लाख रुपये आहेत.सभासद संख्या 1 हजार 870 इतकी आहे.या संस्थेच्या माध्यमातून कामगारांना कर्ज पुरवठा,किराणा माल,फर्निचर,भांडी व स्टेशनरी आदींची माफक दरात विक्री केली जाते.या निवडीबद्धल कृष्णा साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ.सुरेश भोसले,कृष्णा बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी नूतन अध्यक्ष,उपाध्यक्ष व संचालक मंडळाचे अभिनंदन केले.











































































