Last Updated on 08 Jun 2023 7:43 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । साखराळे येथील जवाहर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष शशिकांत शामराव पाटील यांची रेठरे बु: येथील कृष्णा सहकारी कृषी उद्योग संघाच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. संस्थेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.एस.सपकाळ यांनी जबाबदारी पाहिली आहे.
कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार स्व.जयवंतराव भोसले (आप्पा) यांनी 1969 साली या संस्थेची स्थापना केली असून संस्थेच्या माध्यमातून कृषीपूरक औजारे, सयंत्र निर्मिती केली जात आहे.
संस्थेची निवडणूक नुकतीच बिनविरोध करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी संदीप वसंतराव यादव (गोंदी) यांची निवड करण्यात आली आहे. नूतन संचालक- वसंतराव पवार, सर्जेराव थोरात,निवासराव थोरात,दत्तात्रय जाधव,प्रकाश पाटील,संजय निकम,सुनंदा माने,सुनिता पाटील,शिवाजी कुंभार,हिंदुराव येडगे,गौतम मगरे.
कृष्णेचे अध्यक्ष डॉ.सुरेश भोसले, उपाध्यक्ष जगदीश जगताप,युवा नेते अतुलबाबा भोसले,विनायक भोसले,तसेच इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आनंदराव पाटील,जेष्ठ नेते बाळासाहेब पाटील यांनी नूतन अध्यक्ष शशिकांत पाटील यांच्यासह उपाध्यक्ष व संचालकांचे अभिनंदन केले.







































































